नाशिक : परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराकडून तोट्यामुळे कमी करण्यात आलेल्या बसफेºयांमुळे विद्यार्थी, नोकरदार, नागरिक यांचे अतोनात हाल होत असून बसफेºया पूर्ववत सुरू करून बससेवा सुरळीत करावी, या मागणीसाठी सीटू, आयटक, छात्रभारती आदी विविध संघटनांकडून गुरुवारी (दि.५) एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.विभागीय नियंत्रक यामिनी जोशी दौºयावर असल्याने सहायक पाटोळे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. तोट्याचे कारण देत नाशिक आगाराकडून २७४ पैकी १४५ बसफेºया बंद करण्यात आल्या असून, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, कामगार यांचे मोठे हाल होत असून, खासगी वाहनांमधून नाईलाजास्तव जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. याप्रसंगी घंटागाडी कर्मचारी युनियन, हॉकर्स युनियन, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, मूलभूत हक्क आंदोलन, महाराष्टÑ युवा परिषद, मानव उत्थान मंच, दक्षिणायन आदी विविध संघटनांचे स्वातंत्रसैनिक वसंतराव हुदलीकर, डॉ. डी. एल. कराड, शांताराम चव्हाण, श्रीधर देशपांडे, अॅड. वसुधा कराड, मुकुंद दीक्षित, डॉ. मिलिंद वाघ, राजू देसले, जगबिर सिंग, श्यामला चव्हाण, वासंती दीक्षित, डॉ. रोहित कसबे आदी उपस्थित होते.
शहर बसफेºया पूर्ववतसाठी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 12:45 AM