नाशिकरोड : शासनाकडून तत्त्वत: मागण्या मान्य होऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ विभागीय आयुक्त कार्यालय येथे नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने घोषणा देत निदर्शने करण्यात आली.नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे ४३०० वरून ४६०० करण्यात यावे, महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहायक करण्यात यावे, नायब तहसीलदार संवर्गातील सरळ भरतीचे प्रमाण ३३ टक्क्यांवरून २० टक्के करण्यात यावे, अव्वल कारकून (वर्ग ३) या संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे, विभागांतर्गत जिल्हा बदलीचे अधिकार विभागीय आयुक्त यांना प्रदान करण्यात यावे आदी विविध मागण्या शासनाकडून तत्त्वत: मान्यता होऊनही अद्याप त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी दुपारी जेवणाच्या सुटीत घोषणा देत घंटानाद व निदर्शने करण्यातआली.आंदोलनामध्ये संघटनेचे कार्याध्यक्ष तुषार नागरे, सचिन मारके, श्याम शिंदे, उमेश बडगुजर, भटू वाघ, माया नाटकर, प्रिया सोनार, सुप्रिया खोडके, कविता उफाडे, दीपाली घुगे, समीर कातकाडे, संतोष सगळे, सुनील धात्रक, अरुण सुकटे, एंडाईत, खैरनार, भोसले आदी सहभागी झाले होते.
विगागीय आयुक्तालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:53 PM