नाशिक : राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) यांना विरोध करण्यासाठी आणि देशाची ढासळलेली अर्थव्यवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला मनमाड, सटाणा, नामपूर, चांदवड आदी ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला.चांदवडला तहसीलदारांना निवेदनचांदवड येथे शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चांदवड शहर कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये टॅक्सी, रिक्षा सर्वच दुकानदारांनी सहभाग घेतला तर अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होत्या. यावेळी वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. तालुकाध्यक्ष मंगेश केदारे, मनोहर बनकर, संजय भंडागे, आनंद बनकर, संजय वा. केदारे, योगेश जगताप, संतोष नामदेव केदारे, संजय जाधव यांच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार के.पी. जंगम, एस.पी. भादेकर यांना निवेदन दिले आहे.यावेळी बंद शांततेत संपन्नझाला. चांदवडचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.नामपूरला घोषणाबाजीनामपूर : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे कार्यकर्त्यांनी एकत्र येत कायद्याविरोधात घोषणाबाजी केली. परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. जायखेडा पोलीस स्टेशनअंतर्गत नामपूर औट पोस्टचे सहायक पोलीस निरीक्षक कोळी यांना देण्यात आले.सटाण्यात आंदोलनसटाणा : भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर बागलाण तालुकाध्यक्ष चेतन विनस, सटाणा शहराध्यक्ष शेखर बच्छाव, युवा शहराध्यक्ष जितेंद्र सरदार, दादा खरे, विकी पवार, हर्षल सोनवणे आदींच्या सह्या आहेत.मनमाड शहरातील बाजारपेठ बंदमनमाड शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. व्यापारीवर्गानेही बंदमध्ये सहभागी होत पाठिंबा दिला. बाजार समितीदेखील बंद होती. आंदोलकांकडून नगरपालिका प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र पगारे, पी. आर. निळे, यशवंत बागुल, उमेश भालेराव आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्ह्यात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 10:48 PM
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) यांना विरोध करण्यासाठी आणि देशाची ढासळलेली अर्थव्यवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला मनमाड, सटाणा, नामपूर, चांदवड आदी ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला.
ठळक मुद्देबंद शांततेत : चांदवड, मनमाड, नामपूर, सटाण्यात तहसीलदारांना निवेदन