लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, नाशिक राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर, चतुर्थ श्रेणी, कंत्राटी व अंशकालीन कर्मचारी यांच्या देशव्यापी मागणी दिनानिमित्त गुरुवारी (दि.२७) पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने केली.यावेळी पीएफआरडीए कायदा रद्द करा, जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करा, रिक्त पदांवर नियमित भरती सुरू करा, प्रत्येक पाच वर्षाच्या कालावधी नंतर राज्य अंतर्गत वेतन सुधारणा करण्यात यावी, वर्षाच्या कालावधीचा केंद्रीय वेतन आयोग नको, राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या बक्षी समितीचा दसरा खंड अहवाल लागू करून सर्व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी व इतर सेवाविषयक प्रश्न तात्काळ मार्गी लावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी दिंडोरी तालुका ग्रामसेवक युनियन अध्यक्ष सोमनाथ ढोकरे, रवि चौधरी, तलवारे, सय्यद, नवले, भाऊसाहेब, गलांडे, राख, आगळे, महिला अध्यक्ष थविल, महाले, पाटील आदी ग्रामसेवक संघटना पदाधिकारी व सर्व सभासद बांधव उपस्थित होते. गोपाळ खंबाईत, बच्छाव, नंदकुमार पवार, नवाळे उपस्थित होते...अशा आहेत मागण्यामहागाई, बेरोजगारी रोखण्यासाठी जलद उपाययोजना करा, सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करा, अंशकालीन व कंत्राटी कर्मचाºयांच्या सेवा तात्काळ नियमित करा. सार्वजनिक धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करा, मागासवर्गीय कर्मचाºयांचे सध्या रोखलेले पदोन्नती सत्र तात्काळ सुरू करा आदी मागण्यांचा समावेश आहे.
दिंडोरीत विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:29 PM
दिंडोरी : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, नाशिक राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर, चतुर्थ श्रेणी, कंत्राटी व अंशकालीन कर्मचारी यांच्या देशव्यापी मागणी दिनानिमित्त गुरुवारी (दि.२७) पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने केली.
ठळक मुद्दे पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने