सातपूर : बोनस पात्रतेसाठी वेतन मर्यादा काढण्यात यावी, पूर्ण वेतनावर बोनस मिळावा, बोनस कायदा २०१४ पासून लागू करावा यांसह विविध मागण्यांसाठी सीटू युनियनच्या कामगार उपआयुक्तांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आलीत. २ सप्टेंबर २०१५ रोजी सिटूसह अन्य कामगार संघटनांनी बोनस कायद्यात बदल करून पूर्ण वेतनावर बोनस द्यावा, पात्रतेसाठी वेतनमर्यादा काढून टाकावी, अशी मागणी केली होती. मात्र मोदी सरकारने नाममात्र वाढ केली आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी कामगारांना प्रत्यक्षात काहीही फायदा होणार नाही. मोदी सरकारच्या या धोरणामुळे कामगार बोनसपासून वंचित राहणार आहेत. बोनस कायद्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१४ लागू करावी. मानधनावरील कामगारांना बोनस देण्याची विशेष तरतूद करावी या मागण्यांसाठी सीटू युनियनचे श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली.
सीटूतर्फे कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने
By admin | Published: October 25, 2015 10:52 PM