खरीप हंगाम तोंडावर असताना राज्य सरकारने हंगामाच्या तयारीकडेही अक्षम्य दुर्लक्ष चालविले असून, परिणामी शेतकऱ्यांना आतापासूनच खतांची तीव्र टंचाई भासू लागली आहे. केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर दररोज वाढवत आहे. शंभरी पार केलेले पेट्रोल, शंभरी गाठू पाहणारे डिझेल आणि हजाराकडे झेपावणारा स्वयंपाकाचा गॅस, तसेच महाग होत जाणारे खाद्यतेल ही मोदी सरकारने गरीब जनतेला दिलेली भेट आहे. या साऱ्याचा परिणाम बाजारातील सर्वच वस्तू महाग होण्यावर होत आहे. बाजारपेठेत खते, बी-बियाणे, औषधे स्टॉक करून तुटवडा निर्माण करून ते चढ्या भावाने विकले जात आहेत. शेत मजूर, बांधकाम मजूर, बाजारात पाल ठोकून भाजीपाला व इतर वस्तू विकणारे, हातगाडीवाले, टपरी धारक, खासगी वाहतूक करणारे जीप चालक, आदी कष्टकऱ्यांना लॉकडाऊनमुळे फार मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. त्यांना सरकारने पुढील सहा महिन्यांकरिता आर्थिक साहाय्य द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात सावळीराम पवार, इंद्रजित गावित, सुभाष चौधरी, उत्तम कडू, जनार्दन भोये, भिका राठोड, सुरेश गवळी, राजूबाबा शेख, भिमाशंकर चौधरी, रमेश वाडेकर, देवा हाडळ, चिंतामण गवळी, चंदर वाघमारे, मोशिन काझी, अबू मौलाना, बिराडे अण्णा, रामा बोरसे, सुभान गांगोडे, मोहन पवार, आदी सहभागी झाले होते.
फोटो- १७ सुरगाणा आंदोलन
सुरगाणा येथे तहसील कार्यालयासमोर निदर्शने करताना माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांच्यासह कार्यकर्ते.
===Photopath===
170621\17nsk_62_17062021_13.jpg
===Caption===
फोटो- १७ सुरगाणा आंदोलन सुरगाणा येथे तहसील कार्यालयासमोर निदर्शने करताना माकपचे माजी आमदार जे.पी. गावित यांचेसह कार्यकर्ते.