नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे कृषिकन्यांनी शेतकºयांसाठी विविध शेतीविषयक प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकºयांना मूषक नियंत्रणाची प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आली.महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सेवा संस्कार संस्थेचे कृषी महाविद्यालय मालदाड येथील कृषिकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उपक्रम राबविण्यात आला. कृषिकन्यांनी मुख्यत: मूषक नियंत्रणामध्ये पुढील चार गोष्टींवर भर देण्यात आला. नारळाच्या झाडावरील उंदराचा उपद्रव कसा कमी करावा यासाठी लोखंडी मऊ पत्रा व खिळे या साधनसामग्रीचा वापर करीत झाडाच्या सरासरी पाच फूट उंच पत्रा गोलाकार आकारात लावण्यात आला. त्यामुळे उंदरांचा उपद्रव नारळावरती कमी होतो. अशा उपयुक्त व कमी खर्चिक पद्धतीने शेतकºयांनी मूषक नियंत्रण करावे, असे आवाहन कृषिकन्यांनी यावेळी केले. यावेळी मधुबाला आहेर, वर्षा भोपळे, कल्याणी जगताप, प्रतीक्षा खरात, प्राजक्ता घोगरे, सायली अमोलिक या कृषिकन्यांनी शेतकºयांना माहिती दिली. याप्रसंगी प्रवीण आव्हाड, नवनाथ आव्हाड, माधव जाधव, चंद्रभान जाधव, गंगाधर सानप, बबन आव्हाड, रावसाहेब कांगणे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
दोडी येथे मूषक नियंत्रणाचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 6:19 PM