ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.23- देना बँकेच्या साक्री शाखेतून दूध डेअरीची मशिनरी तारण ठेवून कर्ज घेत त्याची फेड न करता फसवणूक करणा:या पाच जणांविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सोमवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील कर्ज वसुली प्रकरणे हाताळणा:या विभागाने हा निर्णय दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला़
देना बँकेच्या साक्री जि़ धुळे येथील शाखेतून साक्री येथील गोसावी दूध डेअरी व कृषी उत्पादक लिमिटेड विसरवाडी ता़ नवापूर या दोन संस्थांनी कडवान ता़ नवापूर शिवारातील गट नं 18/01 मध्ये सुरू केलेल्या साई गोस्वामी दूध डेअरी व कृषी उत्पादक लिमिटेडची मशिनरी तारण देऊन तीन कोटी 73 लाख रूपयांचे कर्ज घेतले होत़े या दोन्ही संस्थांनी 16 फेब्रुवारी 2013 ते 6 जानेवारी 2015 या काळात हे कर्ज घेतले होत़े कर्ज घेतल्यानंतर संबधित संस्थांनी बँकेच्या रकमेची कोणत्याही प्रकारे परतफेड केली नाही़ याउलट बँकेत तारण दिलेली मशिनरी चोरीस गेल्याचे भासवून बँकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला़ हा प्रकार बँकेच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून न्यायालयात सचिन हिरालाल गोसावी, योगेश हिरालाल गोसावी, प्रमिला हिरालाल गोसावी, मधुकर गोपजी गावीत, बिजू गोविंद गावीत सर्व रा़ साक्री, गोसावी दूध डेअरी साक्री जि़ धुळे आणि कृषी उत्पादक लिमिटेड विसरवाडी ता़ नवापूर यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती़ याबाबत न्यायालयात कामकाज झाले होत़े सोमवारी न्यायालयाने देना बँकेच्या बाजूने निकाल देत पाच संशयित आरोपी व दोन्ही दूध संस्था यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल़े
सोमवारी सायंकाळी उशिराने प्राप्त झालेल्या आदेशानुसार विसरवाडी पोलीस ठाण्यात साक्री देना बँक शाखेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी क़ेआऱपाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती देण्यात आली आह़े
औरंगाबाद खंडपीठात सुनावणी
देना बँकेच्या साक्री शाखेकडून औरंगाबाद खंडपीठात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती़ यापूर्वी या याचिकेवर झालेल्या सुनावणीत सचिन गोसावी याच्याकडून वसूली करून घेण्यासाठी बँकेने त्याचे सटाणा जि़नाशिक येथील घर विक्री करण्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार बँकेने कारवाई केली आह़े
कडवान येथे स्थापन करण्यात आलेल्या डेअरीची मशिनरी चोरीला गेल्याचे सर्व संशयितांनी भासवल्याचे न्यायालयाने म्हटले असून, मशिन चोरी प्रकरणाची चौकशी करून बँकेने कर्ज दिलेल्या रकमेची पूर्ण वसुली करण्याचे आदेशही दिले आहेत़