१ जानेवारी ते ४ सप्टेंबर या कालावधीत २ हजार ८३२ संशयित डेंग्यू आढळले होते. त्यांच्या रक्तनमुन्यांची तपासणी केल्यानंतर ६४७ जणांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले. इतकेच नव्हे तर चालू महिन्यात म्हणजेच १ ते ४ सप्टेंबर या चार दिवसांतच डेंग्यूचे ७० रुग्ण आढळले आहेत, तर चिकुनगुनियाच्या १ हजार ५४७ संशयित रुग्णांपैकी की ४८२ जणांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचे आढळले आहे. चालू महिन्यात ४ सप्टेंबरपर्यंत चिकुनगुनियाचे ४० नवे रुग्ण आढळले आहेत.
डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण आढळल्याने महापालिकेने युद्धपातळीवर डास निर्मूलन राबवल्याचा दावा केला आहे. शहरातील २ लाख १३ हजार ६०६ घरांमध्ये धूरफवारणी करण्यात आली असून डासांची उत्पत्ती स्थाने आढळलेल्या ५८ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.
इन्फो...
पाच वर्षांतील रुग्णसंख्या (जानेवारी ते ऑगस्टपर्यंत)
वर्ष डेंग्यू चिकुनगुनिया
२०१७- १५१ ४
२०१८ - ३६ ४०
२०१९- १७७ १
२०२०- ११५ ७
२०२१- ५७७ ४४२
इन्फो...
तीन विभागांत सर्वाधिक रुग्ण
शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी या तीन विभागांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सिडको विभागात सर्वाधिक १४५ रुग्ण, पंचवटीत ११३, तर सातपूरमध्ये १०८ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर पूर्व विभागात ४४, नाशिकरोड विभागात १०१, तर पश्चिम विभागात ६६ रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुनियाचे सर्वाधिक १३८ रुग्ण सिडको विभागातच आढळले असून त्या खालोखाल सातपूर विभागात १३६, पश्चिम विभागात ७०, पंचवटी विभागात ५४, नाशिकरोड विभागात २४, पूर्व भागात २० चिकुनगुनियाचे रुग्ण आढळले.
इन्फो...
- १ लाख २६ हजार २०१ घरांची तपासणी
- ४ हजार १२३ कंटेनर्समध्ये आढळल्या अळ्या
- २ हजार ९२५ कंटेनर्स केले रिक्त
- १ हजार २४९ कंटेनर्समध्ये औषधाची फवारणी