नाशिक : महापालिकेत डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणीचा ठेका अजूनही निविदाप्रक्रियेतच अडकला असून, आरोग्य विभागाने मे-जून या दोन महिन्यांतच डासांवर नियंत्रण मिळविले नाही तर मागील वर्षाप्रमाणेच पुन्हा एकदा शहरावर डेंग्यूचे संकट येऊ शकते. त्यातच आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात सिंहस्थ कुंभपर्वणीच्या काळात कोट्यवधी भाविक शहरात दाखल होणार असल्याने त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने डासांची उत्पत्तिस्थाने शोधून आतापासूनच पेस्ट कंट्रोलची एक मोहीमच हाती घ्यावी, अशी सूचना महापालिकेचे सभागृहनेते सलीम शेख यांनी केली आहे. महापालिकेत गेल्या दीड-दोन वर्षांपासून पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला वारंवार देण्यात येणाऱ्या मुदतवाढीचा प्रश्न गाजतो आहे.
पुन्हा एकदा शहरावर डेंग्यूचे संकट
By admin | Published: May 12, 2015 1:57 AM