सिडको : सिडको भागात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाही महापालिकेकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने याबाबत उपाययोजना करावी यासाठी आज छत्रपती सेनेच्या वतीने महापालिका अधिकाºयांना डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. सिडको भागात दिवसेंदिवस डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही आरोग्य व मलेरिया विभाग सुस्तावलेलाच दिसून येत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. तुळजाभवानी चौक या परिसरातच पन्नासहून अधिक रुग्ण आढळून आले असून, यात दिवसेंदिवस वाढ होत असतानाही मनपाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. अस्वच्छतेमुळे सिडको भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत असल्याने आज छत्रपती सेनेच्या वतीने महापालिका अधिकाºयांना डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट देऊन अनोखो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती सेनेचे संस्थापक चेतन शेलार, मार्गदर्शक नीलेश शेलार, अध्यक्ष तुषार गवळी, कुणाल बागडे, राजेश पवार, सागर अहेर, संदीप निगळ, सागर पवार, सुनील देशमुख, नितीन काकुस्ते, सागर धोंगडे, देवा माळी, मुकेश पाटील, सारंग निकम आदी उपस्थित होते.
डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:06 AM