नाशिक : शहरातील आनंदवली भागातील एका डॉक्टरचा डेंगूसदृश आजाराने खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. शहरात डेंगूचे रुग्ण वाढत आहे, दोन दिवसांपूर्वीच कर्मयोगी नगरमध्ये एकाचा मृत्यू झाल्यानंतर हा दुसरा बळी आहे. गेल्या 15 दिवसात 50 रुग्ण आढळून आले आहे.
महापालिकेतर्फे शहरात धूर फवारणी केली जात आहे. शहरातील प्रभाग चोवीसमध्ये डेंगू, मलेरियासह साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. घरोघरी अनेक रुग्ण साथीच्या आजाराने फणफणले आहेत. महापालिकेने सर्व प्रभागात नियमित धूर फवारणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील एका डॉक्टरचा खासगी रुग्णालयात डेंगूसदृश आजाराने मृत्यू झाला आहे. मलेरिया विभागाच्यावतीने सॅम्पल पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. या रुगणाची किडनी, लिव्हर निकामी झाले होते.-डॉ तानाजी चव्हाण, आरोग्यअधिकारी, नाशिक मनपा