शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

डेंग्यू, हिवताप आजारांची साथ

By admin | Published: August 28, 2016 10:54 PM

चांदवड : काळजी घेण्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन

 चांदवड : शहरात अलीकडच्या काळात साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया व हिवताप या आजारांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उसवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय व पंचायत समिती चांदवडतर्फे व तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेवकांमार्फत शहरामध्ये साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी दैनंदिन गृहभेटी व कंटेनर सर्वेक्षणची मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे डास अळ्या आढळून येणाऱ्या भांड्यामध्ये, पिंपात व सांडपाणी साचून राहिलेल्या ठिकाणी अ‍ॅबेट (टेलिफॉस)चे अळीनाशक द्रावण टाकले जात आहे. अनेक घरांवरील टायर्स काढले जात आहेत, तर दूषित पाणी फेकून दिले जात आहे; मात्र काही नागरिक आरोग्य कर्मचाऱ्यांशी पाणी फेकण्यावरून व औषधे टाकण्यावरून वाद घालत आहेत. जनतेने वाद न घालता आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व डॉ. प्रदीप जायभावे यांनी केले आहे. माहितीपत्रकाचे वाटप केले जात आहे. डासांची पैदास साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्याने पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास डासांची निर्मिती व पर्यायाने साथीच्या आजारांवर निर्बंध घालता येतील. (वार्ताहर)