नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून शहरात धुमाकूळ घालणाºया डेंग्यूच्या आजाराचा प्रभाव आता ओसरत चालला असून, गेल्या पंधरा दिवसांत संशयित ३३ रुग्णांपैकी ८ जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे. डेंग्यूच्या डेंजर झोनमधून नाशिक बाहेर पडले असले तरी महापालिकेने मात्र आपल्या स्तरावर उपाययोजना चालू ठेवली आहे. गेल्या तीन वर्षांपासून नाशिक शहर डेंग्यूच्या विळख्यात अडकले होते. मुंबई-पुण्यानंतर नाशिक ‘डेंग्यू’च्या डेंजर झोनमध्ये होते. महापालिकेकडे असणारा कर्मचाºयांचा अभाव व पेस्ट कंट्रोलबाबत वाढत्या तक्रारी यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे अवघड होऊन बसले होते. डिसेंबर २०१७ मध्ये डेंग्यूचे ३७४ संशयित रुग्ण आढळून आले. त्यातील १६९ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. नोव्हेंबर महिन्यात ६४४ संशयितांपैकी २७६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. सन २०१७ मध्ये वर्षभरात २१६८ संशयितांपैकी ९४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या दप्तरी आहे. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. १५ दिवसांत ३३ संशयितांचे रक्तनमुने तपासले असता त्यातील ८ रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली आहे. वातावरणातील बदलाचाही त्यावर परिणाम दिसून येत आहे. डेंग्यूचा प्रभाव ओसरत चालला असला तरी, महापालिकेकडून मात्र घरोघरी प्रबोधनपर मोहीम सुरूच असून, एडीस जातीच्या डासांच्या अळ्या नष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे. सध्या शहरात ठिकठिकाणी नवीन बांधकामांनाही वेग आला आहे. त्यामुळे महापालिकेने बांधकामांच्या ठिकाणीही जाऊन तपासणी मोहीम हाती घेतली असून, डासांच्या अळ्या आढळून आल्यास संबंधिताना नोटिसा बजावल्या जात आहेत.स्वाइन फ्लूचा जोर कमीथंडीमुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढला होता. परंतु, शहरात स्वाइन फ्लूचाही जोर कमी झालेला असून, महापालिकेने त्यासंदर्भातही आपल्या स्तरावर उपाययोजना सुरू ठेवल्याची माहिती आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत देण्यात आली. अजून किमान महिनाभर त्याबाबत काळजी घ्यावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरात डेंग्यू आजाराचा प्रभाव ओसरला डेंजर झोनमधून बाहेर : महापालिकेकडून उपाययोजना सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:26 AM
नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून शहरात धुमाकूळ घालणाºया डेंग्यूच्या आजाराचा प्रभाव आता ओसरत चालला असून, गेल्या पंधरा दिवसांत संशयित ३३ रुग्णांपैकी ८ जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे.
ठळक मुद्देमहापालिकेकडे कर्मचाºयांचा अभाव२७६ रुग्णांना डेंग्यूची लागण