ठळक मुद्देरहिवाशांशी संवाद साधुन माहितीपत्रकाचे वाटप
उपनगर : परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्युचे अनेक रूग्ण आढळुन आल्यामुळे उपनगरच्या परिसरात मनपा आरोग्य विभागातर्फे डेंग्यु प्रतिबंधात्मक व जनजागृती मोहीम राबविण्यात आली.मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रहिवाशांशी संवाद साधुन माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. परिसरात धूर फवारणी करून उघड्या विहिरी व पाणी साचलेल्या डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले. यावेळी नगरसेविका सुषमा पगारे उपस्थित होत्या.