नाशिक : मुंबई, पुणे, ठाणे आणि नगरमध्ये डेंग्यूच्या आजाराचा ‘ताप’ वाढला असतानाच नाशिकमध्येही गेल्या आठ महिन्यांत ५०० हून अधिक रुग्णांना डेंग्यूने पछाडल्याचे निदर्शनास आले आहे. नाशिकमध्येही डेंग्यूने थैमान घातल्याने त्याची गंभीर दखल राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतली असून, सहायक संचालकामार्फत पाहणी केल्यानंतर महापालिकेकडून दि. १२ ते २३ सप्टेंबर या कालावधीत विशेष कृती कार्यक्रम राबविला जात आहे. नाशिक शहरात १ जानेवारी ते १४ सप्टेंबर २०१६ या कालावधीत १३५७ रुग्णांचे रक्तजलनमुने तपासण्यात आले असता त्यातील ५०३ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मे महिन्यापासून शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत भर पडत असून, दि. १ ते १४ सप्टेंबर या कालावधीत ३४५ रक्तनमुन्यांची तपासणी केली असता ३८ रुग्णांना लागण झाल्याचे निदर्शनास आले. नाशिक शहरातही डेंग्यूने डोके वर काढल्याने त्याची दखल आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतली आणि आरोग्य विभागाच्या पुणे येथील सहसंचालक श्रीमती जगताप यांचेशी चर्चा करून तातडीने उपाययोजनेचे आदेश दिले. त्यानुसार, शासनाचे प्रतिनिधी म्हणून सहायक संचालक डॉ. कदम यांनी नाशिकला भेट देऊन डेंग्यूचा प्रभाव असलेल्या भागाची पाहणी केली.पाचशेहून अधिक रुग्ण : मनपाकडून कृती कार्यक्रम
डेंग्यू थैमान; आरोग्यमंत्र्यांकडून दखल
By admin | Published: September 17, 2016 12:32 AM