इंदिरानगर : परिसरात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, महापालिका प्रशासनाची उदासीन भूमिका असल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुख्य रस्त्यावरून धूर फवारणीचा रोड शो करून काय साध्य करत आहे, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.इंदिरानगर, परबनगर, सराफनगर, सूचितानगर, कलानगरसह परिसरात दिवसागणिक डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील मनपाचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे डासांच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संध्याकाळ होण्याच्या आतच घरांची दारे तसेच डासांवर प्रतिबंधासाठी मॅट क्वॉईल, अगरबत्तीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या लक्षात घेता धूर फवारणीची उपाययोजना करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
इंदिरानगर परिसरात डेंग्यूसदृश रुग्ण
By admin | Published: August 27, 2016 11:54 PM