लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : परिसरात मोठया प्रमाणात वातावरणात बदल झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून परिसरात संध्याकाळी पाऊस, पहाटे दवबिंदू तर सकाळी दाट धुके पडत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. दाट धुक्याने कांदा लागवडीसाठी तयार असलेले कांदा रोप सडू लागल्याने शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.सुरु वातीपासूनच समाधानकारक असलेल्या पावसाने मध्यंतरी ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके सुकू लागली होती. मात्र, गेल्या दहा-अकरा दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग व इतर पिकांना फायदा झाला आहे.तर गेल्या तीन दिवसांपासून परिसरात पहाटेच्या वेळेस दवबिंदू व दाट धुके पडत असल्याने शेतात कांदा लागवडीसाठी तयार असलेले कांदा रोप सडल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील वर्षी कांद्यास चांगला बाजारभाव मिळाल्याने यंदा शेतकरी वर्गाने मोठया प्रमाणात कांदा रोपे टाकले आहे. धुक्यामुळे या रोपांचे नुकसान होत असल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक फटका बसला आहे.
दाट धुक्याने कांदा रोपांचे पाटोदा परिसरात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 3:40 PM
पाटोदा : परिसरात मोठया प्रमाणात वातावरणात बदल झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून परिसरात संध्याकाळी पाऊस, पहाटे दवबिंदू तर सकाळी दाट धुके पडत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. दाट धुक्याने कांदा लागवडीसाठी तयार असलेले कांदा रोप सडू लागल्याने शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्दे पावसाने मध्यंतरी ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके सुकू लागली होती.