शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

लग्नास नकार दिल्याने तरुणीची वडिलांसमोरच हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 1:13 AM

लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने येथे तरुणीच्या घरात शिरून तिच्या वडिलांसमोर धारदार शस्त्राने तिची निर्घृण हत्या केली. यानंतर सदर तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठत शरणागती पत्करत गुन्ह्याची कबुली दिली.

कसबेसुकेणे : लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने येथे तरुणीच्या घरात शिरून तिच्या वडिलांसमोर धारदार शस्त्राने तिची निर्घृण हत्या केली. यानंतर सदर तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठत शरणागती पत्करत गुन्ह्याची कबुली दिली. येथील राजवाडा भागात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सोनाली ऊर्फ विद्या चंद्रकांत ढेंगळे (२१) असे मृत तरुणीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कसबे सुकेणे येथील विद्या चंद्रकांत ढेंगळे ही मंगळवारी राहत्या घरी वडिलांसोबत घरकाम करीत होती. यादरम्यान आरोपी सूरज दिगंबर चव्हाण (२८) रा. मौजे सुकेणे याने घरात घुसून धारदार शस्त्राने विद्याच्या मानेवर, डोक्यावर, पाठीवर व हातावर वार केले. या हल्ल्यात सोनालीचा जागीच मृत्यू झाला. वडिलांनी मुलीला वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी सूरजने त्यांच्या डोक्यावर व हातावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना कसबे सुकेणेच्या सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या घटनेमुळे कसबे सुकेणेच्या राजवाडा परिसरात तणाव असला तरी शांतता आहे. अपर पोलीस अधीक्षक गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी झेंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच तपासाबाबत सूचना केल्या.गर्दीवर नियंत्रणहल्ल्यानंतर आरोपी सूरज चव्हाण हा पोलिसांना शरण आला असून, त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर घटना प्रेमप्रकरणातून झाली असून, लग्नास नकार दिल्याने आरोपीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.  घटनेची माहिती मिळताच कसबे  सुकेणे पोलीस आउटपोस्टचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, पोलीस नाईक रामदास घुमरे, के.बी. यादव यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवित पंचनामा केला.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा