देवळा : बेजबाबदार व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम देवळा पोलिसांकडून सुरू असून आतापर्यंत लॉक डाऊन आदेशाचे उल्लंघन करणाºया ३० नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर नियमभंग करणाºया ४०० वाहनचालकांकडून ८० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांनी दिली आहे.२० एप्रिलनंतर नियमात थोडी शिथिलता देण्यात आली. यामुळे शहरातील रस्त्यांवर अनपेक्षितपणे वाहनांची वर्दळ वाढून कोरोनाला नागरीक गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसू लागले. देवळा शहरापासून अवघ्या ४५ कि. मी. अंतरावर असलेल्या मालेगाव शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येने शंभरी पार केली असून १६ कोरोना बाधित रु ग्ण मृत्युमुखी पडले आहेत. यात दररोज सातत्याने नवीनरूग्णांची भर पडत आहे. यामुळे देवळा तालुक्यातील नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे वारंवार आवाहन करूनही काही निष्काळजी नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अत्यावश्यक सेवा देणाºया व्यतिरिक्त अन्य नागरिकांनी रस्त्यावर वाहने घेऊन कोणी फिरू नये, ह्या नियमांचे उल्लंघन करीत क्षुल्लक कारणे देत नागरिक रस्त्यांवर वावरतांना दिसतात. विविध कामांच्या बहाण्याने दुचाकी सर्रास रस्त्यावर दिसून येतात. त्यांंना आळा घालण्यासाठी पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पाचकंदील चौकात विनाकारण रस्त्यावर फिरणार्या, मास्क न वापरणाºया, व कागदपत्रांची अपूर्तता असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर वाहन जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्यात आली. आतापर्यंत विविध ४०० वाहनांवर कारवाई करण्यात येऊन ८० हजार रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आपल्या वाहनावरून फिरणाºया नागरिकांच्या कामांची पडताळणी करण्यात येत आहे. यामुळे विनाकारण फिरणार्या वाहनांना चांगलाच आळा बसला. नागरिकांंनी कारवाईचे स्वागत केले आहे.सदर कारवाईत सहा.पोलिस उपनिरीक्षक सिताराम बागुल, निलेश सावकार, अंकुश हेंबाडे, सचिन भामरे, चंद्रकांत निकम आदी पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.------------अनेकांकडून नियमभंगपोलिसांकडून नियमभंग करणा-या वाहनचालकांवर कारवाई सुरू असताना कारवाई टाळण्यासाठी वाहन चालक विविध कारणे देत होते. तसेच आपल्या परीचयातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना फोन करून पोलिसांनी कारवाई टाळावी यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती करीत होते. परंतु पोलिसांनी याबाबत खंबीर भूमिका घेत असे कुठलेही फोन घेण्याचे टाळले व संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली.
देवळा पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 3:06 PM