देवळा : देवळा तालुक्यात भुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात १३४ पैकी ६८ रु ग्ण करोना पॉझीटिव्ह आढळले असून त्यात तब्बल ४२ रु ग्ण देवळा शहरातील आहेत, त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.देवळा तालुक्यात बुधवारी (दि.३०) पासून जनता कर्फ्यु चालू असताना व सर्व व्यवहार बंद असतानाही अजूनही नागरिकांचा मुक्त संचार दिसून येत असल्याने जनता कर्फ्युतही परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. गुरुवारी (दि.१) प्राप्त झालेल्या १३४ अहवालांपैकी ६८ रु ग्ण करोना पॉझीटिव्ह आढळून आले असून ६६ रु ग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.तालुक्यातील जनतेने घाबरून न जाता करोनाची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ तपासणी करावी व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून कामानिमित्तच घराबाहेर पडावे व मास्कचा वापर करावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी केले आहे.गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या नागरीकांना वारंवार थुंकावे लागते. थुंकण्यातून कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग होतो. वारंवार थुंकावे लागत असल्यामुळे हे नागरीक मास्कचा वापर करीत नाहीत. नियमांचे पालन न करणाºया अश्या नागरीकांमुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमुख कारण आहे.महाराष्ट्र राज्यात शासनाने गुटख्यावर बंदी घातली आहे. परंतु अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी तालुक्यात फिरकत नसल्याने शहरात अवैधरीत्या गुटखा आणून अवास्तव किमतीत विकून विक्र ेते संधीचा गैरफायदा घेत आहेत. अन्न सुरक्षा व कायद्यान्वरे अशा विक्र ेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.देवळा शहरातील काही कोरोना बाधित व्यक्ति १७ दिवस घरात कोरंटाईन न होता गावात मुक्त संचार करतांना दिसत असून कोरोना रूग्णांची संख्या वाढवण्यात हातभार लावत आहेत. नगरपंचायतीने अशा बेफिकीर नागरीकांचा बंदोबस्त करावा.(०१ देवळा १)जनता कर्फ्युमुळे देवळा शहरात सटाणा रस्त्यावरील बंद असलेली दुकाने.
देवळा तालुक्यात एकाच दिवसात ६८ कोरोना रु ग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 4:54 PM
देवळा : देवळा तालुक्यात भुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात १३४ पैकी ६८ रु ग्ण करोना पॉझीटिव्ह आढळले असून त्यात तब्बल ४२ रु ग्ण देवळा शहरातील आहेत, त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
ठळक मुद्देबेफिकीर नागरीकांचा बंदोबस्त करावा.