देवळा : तालुक्यातील १६ सोसायटीतील २३ संचालकांना सोसायटी कर्जाची थकबाकी असल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले असून, त्यांचे संचालकपद रद्द झाल्याची माहिती सहाय्यक निबंधक एस.एस. गिते यांनी दिली. सोसायटीच्या ४५ थकबाकीदार संचालकांनी ५५ लाख ५७ हजार ७१६ रुपये थकबाकी भरल्याने त्यांचे संचालक पद कायम राहिले आहे. नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केदा अहेर यांनी जिल्हा बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी त्यांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. यामुळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या थकबाकीदार सभासदांची पैशांची जमवाजमव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. सहकार विभागानेही देवळा तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ६८ थकबाकीदार संचालकांना ३१ डिसेंबर, २०१७ रोजी नोटीस काढली होती. तीन वेळा या थकबाकीदार संचालकांना संधी देण्यात आली असता यापैकी ४५ संचालकांनी त्यांच्याकडील अल्पमुदत, मध्यम मुदत व पीककर्जाची थकबाकी ५५ लाख ५७ हजार ७१६ रुपये भरल्यामुळे त्यांचे संचालकपद कायम राहिले. उर्वरित २३ संचालकांकडे असलेली थकबाकी वसूल न झाल्यामुळे सहाय्यक निबंधक एस.एस. गिते यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८ अ (१) अन्वये संचालकपद रद्द करण्याचा आदेश पारीत करून २३ संचालकांचे संचालकपद रद्द केले आहे. सहकार अधिकारी डी.एन. देशमुख यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.सोसायटी संचालकपद रद्द झालेले गावनिहाय संचालक गुंजाळनगर-२, विठेवाडी-१, देवळा आदिवासी सोसायटी-२, फुले माळवाडी-२, देवपूरपाडा-१, लोहोणेर-१, शेरी वार्शी २, खामखेडा-१, सरस्वतीवाडी-१, भिलवाड-२, वाजगाव -२, कुंभार्डे-२, तिसगाव -१, न्यू वासूळ- १, सांगवी -१, जे.डी. पवार सोसायटी, भऊर-१.पिंपळगाव मोरचे सरपंच, उपसरपंच अपात्रइगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांना नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी अपात्र घोषित केले आहे. ग्रामसभा न घेतल्याने सरपंच अपात्र, तर यापूर्वीचा अविश्वास ठराव विधिग्राह्य ठरवल्याने उपसरपंचांना पद गमवावे लागले आहे. भाजपा नेत्याच्या गटाला यामुळे मोठा धक्का बसला आहे. पिंपळगाव मोरच्या सरपंच कल्पना नामदेव खोडके यांनी अनिवार्य असणाºया ग्रामसभा आणि मासिक सभा घेतल्या नसल्याची बाब पंढरीनाथ काळे यांना माहिती अधिकारातून समजली.यानुसार ग्रामपंचायत सदस्य जीवन नामदेव गातवे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाºयांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सरपंच कल्पना नामदेव खोडके यांना अपात्र ठरविले आहे. उर्वरित काळात त्यांना सरपंचपदाची निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. दुसºया प्रकरणात उपसरपंच अलका संपत काळे यांच्यावरील अविश्वास ठराव इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांनी मंजूर केला होता. त्यांच्या निर्णयाला अलका काळे यांनी आव्हान देऊन अप्पर जिल्हाधिकाºयांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. त्यानुसार सर्वांगीण पुरावे, दोन्ही पक्षांचा युक्तिवाद यानुसार अविश्वास ठराव विधिग्राह्य असल्याचा निर्वाळा देऊन उपसरपंच अलका काळे यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
देवळा तालुका : थकबाकीमुळे सहकार विभागाची कारवाई23 संचालक अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:06 AM
देवळा : तालुक्यातील १६ सोसायटीतील २३ संचालकांना सोसायटी कर्जाची थकबाकी असल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले असून, त्यांचे संचालकपद रद्द झाल्याची माहिती सहाय्यक निबंधक एस.एस. गिते यांनी दिली.
ठळक मुद्देजिल्हा बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न सुरूथकबाकी वसुलीसाठी जोरदार मोहीम