मेशी : तालुकास्तरीय १८ वे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मेशी (ता.देवळा) येथील नवनाथ इंग्लिश स्कूलमध्ये संपन्न झाले.अध्यक्षस्थानी नवनाथ मेडिकल फाउंडेशन अध्यक्ष जे. डी. बोरसे होते. कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून देवळा पंचायत समितीचे सभापती केशरबाई अहिरे, उपसभापती शांताबाई पवार, पंचायत समिती सदस्य सरला जाधव, धर्मा देवरे, गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी विजया फाळके, नंदकुमार देवरे, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय सावंत सरपंच सुनंदा अहिरे आदि मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य भिका बोरसे व विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र कापडणीस यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटातून ३७ व प्राथमिक गटातून ३५ उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. तसेच परिचर गट २, माध्यमिक शिक्षक ७ यांनीही आपली उपकरणे प्रदर्शनात सदर केली.तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा असून उपविषय शाश्वत कृषी पद्धती, स्वच्छता आणि आरोग्य, संसाधन व्यवस्थापन, औद्योगिक कृषी विकास व भविष्यकालीन परिवहन आणि संचार हे होते. या विषयांवर आधारित तालुक्यातून आलेल्या विविध बालवैज्ञानिकांनी स्वनिर्मित अतिशय गुणवत्तापूर्वक तसेच समाजोपयोगी उपकरणे प्रदर्शनात मंडळी होती.विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी गावातील आबालवृद्ध तसेच तालुक्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याप्रसंगी गटशिक्षण अधिकारी सुनिता धनगर यांनी तसेच पं. स. सदस्य धर्मा देवरे यांनी मनोगत व्यक्त केले.या उद्घाटन कर्यक्र म प्रसंगी देवळा पंचायत समितीचे केदा शिरसाठ, मेशी सोसायटीचे चेअरमन श्रीराम बोरसे माजी सरपंच बापू जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शिरसाठ दगा बोरसे, मीरा बोरसे, चेतन चव्हाण, नारायण बोरसे दिलीप पाटील, घनश्याम बैरागी, जयश्री पवार, प्राचार्य दिलीप रणधीर, राजू कापसे भारत सावंत, शाहू शिरसाठ, संजय बोरसे, पवन गरु ड आदींसह ग्रामस्थ, विज्ञान शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
देवळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 5:56 PM
मेशी : तालुकास्तरीय १८ वे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मेशी (ता.देवळा) येथील नवनाथ इंग्लिश स्कूलमध्ये संपन्न झाले.
ठळक मुद्देमेशी येथे उदघाटन : माध्यमिक ३७ तर प्राथमिक ३५ उपकरणांची मांडणी