नाशिक : देवळाली कॅम्प येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएमधून वयोवृद्ध इसमाच्या एटीएम कार्डचा वापर करून दोन लाखांची रोकड काढून फसवणूक केली.श्री रेणुकामाता देवी मंदिर येथील पंचदीप रेणुका माता सोसायटी येथे राहाणारे वयोवृद्ध बाळकृष्ण मुरलीधर पाटील (६२) भामट्याने एटीएम कार्ड घेऊन बनावट एटीएम कार्ड त्यांना दिले. ५ ते ११ मार्च दरम्यान पाटील यांचे एटीएम कार्डचा वापर करून आनंदरोड स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएममधून २ लाख ८ हजार रुपयांची रोकड काढून फसवणूक केली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२० हजारांचे दागिने लंपासबिटको महाविद्यालय पाठीमागील जगताप मळा येथे बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. जगताप मळा डायनेस्टी सोसायटी येथे दीपक दत्तात्रय सामरे यांचा फ्लॅट बंद स्थितीत आहे. २३ मार्च ते १ एप्रिल दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद फ्लॅटचा मुख्य दरवाजा व सेफ्टी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील डब्यात ठेवलेले २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेढे व अंगठ्या चोरून नेल्या.
देवळालीत एटीएममधून दोन लाख लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 11:00 PM
नाशिक : देवळाली कॅम्प येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएमधून वयोवृद्ध इसमाच्या एटीएम कार्डचा वापर करून दोन लाखांची रोकड काढून फसवणूक केली.
ठळक मुद्दे वयोवृद्ध इसमाच्या एटीएम कार्डचा वापर