प्रवीण आडके
देवळाली कॅम्प-नाशिकरोड- भगूरला जोडणारा लॅमरोड हा एकमेव रस्ता आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता रस्ता रुंदीकरण काळाची गरज आहे. पाथर्डी फाटा-देवळाली कॅम्प हेडलाइन हा रस्ता लष्कराने ताब्यात घेतल्यासारखा असून, पूर्वीप्रमाणे नागरिक येथून प्रवास करू शकत नाही. भविष्यात याच रस्त्यावरील सार्वजनिक वाहतूक सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद होण्याची शक्यता आहे. नाशिक- त्र्यंबकेश्वरमार्गे भगूर व पुढे सिन्नरकडे जाणारी वाहतूक ही लॅमरोडने होत असते. लॅमरोड हा एकमेव पर्याय असल्याने दिवसागणिक या रस्त्यावरची वाहतूक वाढतच आहे. सध्या लॅमरोड हा चार पदरी असल्याचे दिसते; बिटको पॉइंटपासून सौभाग्यनगरपर्यंतचा रस्ता मनपाच्या ताब्यात आहे. तो चार पदरी असल्याचे दिसते. नागझिरा नाला ते भगूर बसस्थानकपर्यंतचा रस्ता लष्कराच्या ताब्यात आहे. मात्र या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला, तर दुरु स्त होऊ शकतो.सुमारे शंभर कोटींचे विविध विकासकामे छावणी प्रशासनकडून हाती घेण्यात आले असून, त्यामुळे देवळाली कॅम्प परिसर कात टाकू लागला आहे. सुमारे ६९ कोंटींची भुयार गटार योजना लवकरच कार्याविन्त होणार आहे. शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू झाल्याने आरोग्याचा व सांडपाण्याचे प्रश्न मार्गी लागणार आहे . कॅन्टोन्मेंट खतनिर्मिती प्रकल्प उभा राहणार असल्याने त्याचे योग्य नियोजन झाल्यास दुहेरी फायदा होणार आहे.देशातील ६२ कॅन्टोन्मेंटमध्ये येथील जनरल हॉस्पिटलचा पहिला क्रमांक असून, केवळ देवळाली थोडके नव्हे तर परिसरातील ३० ते ४० गावांना माफक दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत आहे . लवकरच या हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅनची व्यवस्था होत असल्याने पंचक्रोशीसह आजूबाजूच्या गावांना नाशिकला जाण्याची गरज राहणार नाही. उपलब्ध जागेवर हॉस्पिटलचे विस्तारीकरण होऊ शकते, जेणेकरून नागरिकांना चांगल्या सुविधा येथेच मिळू शकतात. देवळालीचे दानशूर व्यक्तिमत्त्व, उद्योगपती वासुमल श्रॉफ यांच्या पुढाकारातून देवळालीवासीयांसाठी स्टेशनवाडीजवळ दारणा नदीलगत स्मशानभूमीची उभारणी होत आहे. श्रॉफ परिवाराकडून देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या रुग्णालयात सव्वा कोटी रुपयांचे नव्याने सुरू होणारे डायलिसीस मशनरी रुग्णांना लाभदायक ठरणार आहे. दवाखानालगत ३५ लाख खर्च करून आधुनिक शवगृह तयार करण्यात आले आहे.आनंद रोड मैदानावर ८ कोटी २५ लक्षाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स- स्टेडियम प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम टप्प्यात मंजुरीस आहे. आत्तापर्यंत याव्यतिरिक्त सव्वा कोटी खर्च करून मैदानावर जॉगिंग ट्रॅक स्टेडियमचा एक भाग पूर्ण झालेला आहे. वडनेर रोडवर सात लाख रुपये खर्च करून उभारलेली व्यायामशाळा नागरिक व तरुण वापरू लागले आहेत. येथील आनंद रोड मैदानावर खासदार हेमंत गोडसे यांनी ५० लाखांचा खर्च करून प्रेक्षक गॅलरी उभारलीआहे. पाणीपुरवठ्यासाठी हिल रेंज परिसरात तयार होऊन वापरात आ लेला चौथा जलकुंभामुळे वॉर्डक्र मांक २ आणि ४ मध्येही मुबलक पाणी उपलब्ध होत आहे. नागरिकांच्या राहणीमानासह इतरही बदल होत आहेत. रस्त्यावरील वाहतुकीत धुळीचे प्रमाण वाढत असले तरी रस्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आह.े आगामी काळात रस्त्यांची संख्या वाढून दळणवळणाची मोठी यंत्रणा उभी राहणार आहे. हे काम पूर्णत्वाकडे जात आहे. देवळालीवासीयांना रस्ता, पाणी, पथदीप या सुविधा पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शासकीय पातळीवर कॅन्टोमेन्ट बोर्डाचा कर भरण्यासाठी अनेक नागरिक नेट बँकिंगचा वापर करताना दिसत आहे. देवळाली कॅम्पचा चेहरामोहरा हळूहळू बदलू लागला आहे. भविष्यात झालेला बदलानंतर व वाढलेल्या इमारतींच्या जाळ्यामुळे कॅम्प -नाशिकरोड शहर असे वेगळेपण दिसणार नाही.नाशिकरोडला जोडणारा मुख्य लॅमरोड हा घोटी-सिन्नर या महामार्गाला जोडणारा रस्ता राज्य महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे. कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या ताब्यातील सदर रस्ता दुरुस्ती व रुंदणीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. बिटको ते भगूर हा संपूर्ण रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, खासदार, आमदार नगरसेवक यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भगूर-सिन्नर व इगतपुरीच्या तालुक्यातील गावांकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. यामुळे औंरगाबाद महामार्ग, त्र्यंबक, वाडा महामार्ग ते घोटी-सिन्नर महामार्गाला जोडणारा नवीन विकासाचा महामार्ग ठरू शकेल.लष्कराने बंद केलेले रस्ते खुले केल्यास वाहतुकीचा ताण कमी होऊ शकतो.शहरातील लढाईमध्ये त्यांना नवी झळाळी देण्यासाठी शहरातील जुन्या इमारतींना नवीन झळाळी देण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने मालकांना परवानगीचे धोरण सुरू केल्याने बाजारपेठेतील दुकानांचे इमारतींचा चेहरा बदलू लागला आहे. मॉल संस्कृतीचे लोण देवळालीत पसरलेले नाही परंतु बदलत्या व्यावसायिक धोरणानुसार मॉल संस्कृती देवळालीत येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे वाढत्या गर्दीला आवर घालण्यासाठी पार्किंगसारख्या सुविधा उपलब्ध करून दिला पाहिजे, त्यावरही बरेच अवलंबून आहे. लष्कराने दारणा नदीपात्रात सुमारे ३० कोटी रुपये खर्च करून पाणी साठवण बंधारा उभारल्याने त्याचा लाभ होत आहे. आगामी वीस वर्षांत होणारी लोकसंख्या लक्षात घेतली तरी प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याची कमतरता पडणार नाही, असे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे; परंतु सध्याच्या बोर्डाच्या वतीने उभारण्यात आलेले तीन जलकुंभ हे अपुरे पडणार असल्याने भविष्यात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्रत्येक वाढण्यासाठी स्वतंत्र जलकुंभ उभारणे गरजेचे ठरणार आहे.नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक वृक्ष देवळालीत असून, कॅम्प रोड, वडनेर रोड या भागात आजही दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वीचे वृक्ष दिसून येतात. देवळाली थंड हवेचे ठिकाण म्हणून आरोग्यासाठी लाभदायी ठरते. देवळालीत पारशी, बोहरी, गुजराथी समाजाच्या ब्रिटिशकालीन उभारलेल्या इमारती आहेत. प्रदूषणाला आळा बसावा म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नियमन आराखड्यानुसार दुमजलीपेक्षा मोठ्या इमारतींना परवानगी नाही. देवळाली कॅम्पमध्ये सीमेंटचे जाळे मर्यादित आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार कॅन्टोन्मेंटच्या निकषात बदल होण्याची शक्यता आहे. ते बदलल्यास भविष्यात पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील, हे नक्की.