देवळाली कॅम्प : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीत शिस्त ही महत्त्वाची असून, गटबाजी करत खोटी पदे वापरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिला.सिंधी पंचायत हॉलमध्ये देवळाली कॅम्प रिपाइं पदाधिकारी पदग्रहण सोहळा मेळाव्यात बोलताना लोंढे यांनी पक्षाच्या वतीने सामाजिक समता अभियान राज्यभर राबविले जात असून, त्याची सांगता मार्च २०१६ मध्ये नाशिक येथे होणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासून तयारीला लागण्याचे आवाहन लोंढे यांनी केले. यावेळी प्रियकीर्ती त्रिभुवन, विश्वनाथ काळे, भाऊसाहेब धिवरे, अमोल पगारे, प्रमोद बागुल, गौतम पगारे, आर. डी. जाधव, सुभाष बोराडे आदिंनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर छावणी परिषदेच्या नगरसेवक प्रभावती धिवरे, माधुरी भोळे, प्रीती भालेराव, सुरेखा भंडारे, संगीता खैरनार आदि उपस्थित होते.यावेळी लोंढे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्राचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक गौतम भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन पंडित साळवे व आभार राजेंद्र जाधव यांनी मानले. जिल्हाध्यक्ष लोंढे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करत त्यांना नियुक्तिपत्र दिले. यावेळी अनिल ढेंगळे, कुंदन दोंदे, रवींद्र केदारे, सुनील पगारे, संजय मोरे, महेंद्र पगारे, देवानंद साळवे, विजय पवार, वामनराव निकम, दीपक घोलप, दीपक जाधव, डी. डी. जाधव आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
देवळाली कॅम्प रिपाइं पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण
By admin | Published: November 15, 2015 10:54 PM