देवळाली कॅम्प : येथील चारणवाडी भागात असलेल्या भाजीपाला गुदामाला गुरुवारी दुपारी आग लागल्याने दोन्ही पत्र्याचे शेड, इंडिका कार, दोन दुचाकी तसेच कांदा, लसूण असा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. गुदामाला आग लावल्याच्या संशयावरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चारणवाडी येथील पुंडलिक नागनाथ जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. भाजीपाल्याचे साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी घरासमोरील मुल्ला अॅँड मुल्ला यांच्या मालकीच्या जागेत ४० बाय २० फुटाचे दोन पत्र्याचे शेड उभारले आहेत.गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जाधव यांच्या भाजीपाला ठेवण्याच्या साहित्याच्या गुदामाला आग लागल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्वरित छावणी परिषदेच्या अग्निशामक केंद्रास कळविण्यात आले.मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने दोन्ही पत्र्याचेशेड, प्लॅस्टिकचे १०० कॅरेट, हजारो रुपये किमतीचा लसूण, कांदा, इंडिका कार (एमएच ०४ बीडी ३७२७), दोन दुचाकी, लाकडाचे दरवाजे, खिडक्या आदी साहित्य व वस्तू जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल चार तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली.गुन्हा दाखलआगीमध्ये लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे. याबाबत गुदामाचे मालक पुंडलिक नागनाथ जाधव यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित सुरेश रघुनाथ कुसाळकर याने अज्ञात व्यक्तीच्या मदतीने गुदामाला आग लावल्याची फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्पला गुदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:10 AM
चारणवाडी भागात असलेल्या भाजीपाला गुदामाला गुरुवारी दुपारी आग लागल्याने दोन्ही पत्र्याचे शेड, इंडिका कार, दोन दुचाकी तसेच कांदा, लसूण असा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.
ठळक मुद्देवाहने जळाली : लाखोंचा माल जळाला