नाशिक : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून यंदा देवळाली कटक मंडळ परिक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना वगळण्यात आले असून यावर्षी केवळ नाशिक महापालिका हद्दीतील 55 महाविद्यालयांमध्ये 27 हजार जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात एसएमआरके महाविद्यालयातील गृह विज्ञान शाखा व हिंदी माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांचा अपवाद असून या दोन्ही महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सहाय्यक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद यांनी दिली आहे.रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी (दि.4) अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, प्रवेश प्रक्रिया समन्वयक वैभव सरोदे, अशोक बागूल, सुनिता धनगर, आर. व्ही. पाटील आदि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दिलीप गोविंद म्हणाले, देवळाली कटक मंडळ परिक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातून प्रवेश घेणाऱ्या विद्यारर्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेताना अनेकदा शहरातील महाविद्यालये मिळाल्याने गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी देवळाली कटकमंडळ परिक्षेत्रातील सुभाष गुजर कनिष्छ महाविद्यालय, श्रीमती विमलाबेन खमजी तेजुकीया महाविद्यालय व नूतन कनिष्ठ महाविद्यालय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. तर महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये पंचवटीतील उन्नती कनिष्ठ महाविद्यालयाची भर पडल्याचे त्यांनी सांगितले. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेविषयीविषयी विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती देण्यासाठी एप्रिल महिन्याच्या अखेर्पयत शाळास्तरावर मेळावे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर मे महिन्याच्या पूर्वार्धात म्हणजेच पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिका व देवळाली कटक मंडळपरिक्षेत्रत गेल्यावर्षी शिक्षण विभागाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया यशस्वी केल्यानंतर यावर्षी कटक मंडळ परीक्षेत्र या प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आल्याने शिक्षण विभागावरील भार काही अंशी कमी झाला आहे. अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून नाशिक शिक्षण उपसंचालकांसह शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी कामाला लागले असून महानगरपालिका परिसरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यामिक विद्यालयांमध्ये सुविधा केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेतून देवळाली कटक मंडळ परिक्षेत्र वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 5:07 PM
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून यंदा देवळाली कटक मंडळ परिक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना वगळण्यात आले असून यावर्षी केवळ नाशिक महापालिका हद्दीतील 55 महाविद्यालयांमध्ये 27 हजार जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात एमएमआरके महाविद्यालयातील गृह विज्ञान शाखा व हिंदी माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांचा अपवाद असून या दोन्ही महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सहाय्यक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद यांनी दिली आहे.
ठळक मुद्दे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची तयारी रावसाहेब थोरात सभागृहात केंद्रप्रमुखांची बैठक55 महाविद्यालयांमधील 27 हजार जागांसाठी प्रवेशप्रक्रिया