लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : भाऊबंदकीच्या वादात अडलेला देवळाणे-गवंडगाव अशा दोन स्वतंत्र गावांना जोडणारा रस्ता अखेर मोकळा झाल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे. विशेष म्हणजे दिवाणी न्यायालयात वाद असतांना त्या वादाच्या गटातील रस्ता सोडून गट नंबर ९ लगत गट नंबर ३ मधून मार्ग काढून रस्ता खुला केला.गेल्या ७० वर्षापासून वादात रस्ता अडकला होता,तहसीलदार रोहिदास वारु ळे आणि संबंधित ग्रामस्थ यांनी सकारात्मक जिद्द ठेवल्याने प्रश्न मार्गी लागल्याने आनंद व्यक्त होत आहे.येवला तालुक्यातील देवळाणे आण िगवंडगाव ही दोन महत्वाची गावे जोडणारा रस्ता गेल्या 6 वर्षांपासून बंद होता. आमच्या गावांना जोडणारा रस्ता नाही,मुलांची शाळा बुडते,4 किमी चा वळसा घालून शाळेला जावे लागते. हा राज रस्ता खुला करावा, अशी मागणी सातत्याने सलग तीन तहसीलदारांकडे ग्रामस्थांनी केली होती. देवळाणे हद्दीत गट नंबर 9 लगत 3 मधून हा शासकीयजिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचेकडे प्रस्तावित करतांना खुला करण्यासाठी प्रलंबित होता. हा रस्ता तहसीलदार रोहिदास वारु ळे आण िशेतकरी व ग्रामस्थांनी चर्चा करून शाळकरी, आदिवासी, व ग्रामस्थांना खुला केला.कायद्याचा धाक आण िहोणारा परिणाम याची जाणीव करून देऊन पोषक वातावरण तयार केले. सोमवारी दिवसभर 8 ते 10 तास भूख तहान विसरून दोन जेसीबी, आण िट्रॅक्टरच्या मदतीने हा रस्ता खुला करण्याची कार्यवाही केली.पंचायत समतिी माजी सभापती रामदास काळे, चांगदेव मोरे,गोरख मोरे, डॉ शरद काळे, रोहिदास काळे, वाल्मिक काळे, रमेश कुटे, गोरख मोरे, मिच्छंद्र मोरे, रंगनाथ मोरे, महेंद्र जाधव, सरपंच आम्रपाली जाधव, नवनाथ काळे, भगवान काळे, भाऊसाहेब काळे, ज्ञानेश्वर मोरे, सोपान काळे,लक्ष्मण मोरे,राजू गोसावी यांनी या मोहिमेत विशेष प्रयत्न केले.कार्यालयीन कामकाजासह प्रत्यक्ष रस्ता मोकळा करण्यासाठी फिल्डवर काम करण्यासाठी शाखा अभियंता व्ही. के. पाटील, उप अभियंता आर. एन. कुरकुरे, पी. पी. जोशी, दीपक दाभाडे, महेश मढवई, नितीन भडकवाडे, मिच्छंद्र लहरे, भाऊसाहेब नवले, अभियंता निकम, पगारे, दूनबळे यांनी सहकार्य केले.
भाऊबंदकीच्या वादात अडलेला रस्ता देवळाणे-गवंडगाव अखेर झाला मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 1:18 AM
येवला : भाऊबंदकीच्या वादात अडलेला देवळाणे-गवंडगाव अशा दोन स्वतंत्र गावांना जोडणारा रस्ता अखेर मोकळा झाल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे. विशेष म्हणजे दिवाणी न्यायालयात वाद असतांना त्या वादाच्या गटातील रस्ता सोडून गट नंबर ९ लगत गट नंबर ३ मधून मार्ग काढून रस्ता खुला केला.
ठळक मुद्देगट नंबर ९ लगत गट नंबर ३ मधून मार्ग काढून रस्ता खुला केला.