नाशिक : दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी घेतला जाणारा विभागीय लोकशाही दिन सोमवारी धूलिवंदनाची सुटी आल्यामुळे येत्या मंगळवारी, दि. १४ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता घेण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. लोकशाही दिन बैठकीत विहित पद्धतीने प्राप्त अर्जावर सुनावणी घेण्यात येणार असून, अर्जदारांनी मूळ अर्जासह सुनावणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन महसूल उपआयुक्त डॉ. संजय कोलते यांनी केले आहे. लोकशाही दिनात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार नाहीत, तसेच विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी अस्तित्वात असलेली न्यायालये, आयोग, लोकायुक्त कार्यालये आदि प्रशासकीय यंत्रणांच्या कक्षेतील न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व अपील, सेवा-आस्थापनाविषयक बाबी, यापूर्वी अंतिम उत्तर दिलेले लोकशाही दिनातील अर्ज, कागदपत्रांची पूर्तता नसणारे अर्ज आणि वैयक्तिक स्वरूपातील नसतील अशा प्रकरणांचे अर्ज विभागीय लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत. लोकशाही दिन सुनावणीसाठी अर्जदारांनी मूळ अर्जासह सुनावणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
विभागीय लोकशाही दिन १४ मार्चला
By admin | Published: March 08, 2017 12:13 AM