नाशिक : महापालिकेच्या विविध उच्चपदस्थ अधिकाºयांच्या चौकशीचा प्रस्ताव महासभेने स्थगित केला असतानादेखील प्रशासनाने त्याची कार्यवाही सुरू केली असून, गेल्या सोमवारपासून विभागीय चौकशी अधिकारी हांडगे यांनी कामकाजास सुरुवात केली आहे.महापालिकेच्या वतीने चालू वर्षीच गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड लॉन्सच्या संरक्षक भिंतीचे बेकायदेशीर बांधकाम पाडले जात असताना जागा मालक प्रकाश व विक्रांत मते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगिती मिळविली होती. सदरचे आदेश प्राप्त होऊनही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने बांधकाम पाडण्यात आले आणि त्यामुळे उच्च न्यायालयाचा अवमान झाल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना माफी मागावी लागली तसेच १७ लाख रुपये खर्च करून सदरची संरक्षक भिंत बांधावी लागली. या प्रकरणात प्रशासनाने केलेल्या चौकशीत अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम आणि अभियंता पी. बी. चव्हाण यांची चौकशी आरंभण्याचा प्रस्ताव महासभेवर सादर केला होता. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त प्रभारी शहर अभियंता उत्तम पवार, माजी मुख्य अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन आणि माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष भंडारी यांची चौकशी करण्याचा प्रस्तावदेखील १९ आॅक्टोबर रोजीच्या महासभेवर मांडला होता; परंतु महासभेने यासंदर्भात शंका घेऊन हा विषय तहकूब ठेवला होता.सोमवारपासूनच कामकाजसदरचा प्रस्ताव तहकूब असताना प्रशासनाने चौकशी मात्र सुरू केली असून, चौकशी अधिकाºयांनी सोमवारपासूनच कामकाज सुरू केल्याचे प्रशासकीय अधिकाºयांनी सांगितले.
महापालिकेतील अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 1:12 AM
नाशिक : महापालिकेच्या विविध उच्चपदस्थ अधिकाºयांच्या चौकशीचा प्रस्ताव महासभेने स्थगित केला असतानादेखील प्रशासनाने त्याची कार्यवाही सुरू केली असून, गेल्या सोमवारपासून विभागीय चौकशी अधिकारी हांडगे यांनी कामकाजास सुरुवात केली आहे.
ठळक मुद्देउच्चपदस्थांचा समावेश : स्थगिती असतानाही कारवाई