सिन्नर : सिन्नर व संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या व श्री बाबीर बुवांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र बुवाजीबाबा देवस्थान डिग्रस ते श्री क्षेत्र बाबीर बुवा देवस्थान, रुई, ता. इंदापूर या पदयात्रेचे मंगळवारी (दि. २६) प्रस्थान झाले. सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती दिंडी चालक उमाजी महाराज पुणेकर यांनी दिली.सदर पायी दिंडी सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील शेकडो भाविक सहभागी होत असतात. यात सिन्नर तालुक्यातील भाविकांचे प्रमाण लक्षणीय असते. गेल्या ३० वर्षांपासून या पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी (दि.२६) संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान डिग्रस येथून या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले. संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते रथाची पूजा होणार आहे.२६ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या पायी दिंडी सोहळ्यात दैनिक कार्यक्रमात पहाटे काकडा, आरती, सायंकाळी हरिपाठ तर रात्री कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांच्या चहा, नास्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सिन्नरसह निफाड व येवला तालुक्यातील भाविक या पायी दिंडीत सहभागी होतात.पायी दिंडी सोहळ्यात प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी अनुक्रमे ह.भ.प. ज्ञानोबा माउली महाराज, तुकाराम महाराज चौधरी, ह.भ.प. रसाळ महाराज, अशोक महाराज सत्रे, अरुणगिरीजी महाराज, राहुल मदने, रमेश महाराज तांबडे, श्यामसुंदर महाराज ढवळे, स्रेहा भोसले, समाधान महाराज घोटेकर यांची कीर्तने होणार आहेत.गुढीपाडव्याच्या दिवशी रुई बाबीर देवस्थान येथे ह.भ.प. नंदकुमार पवार यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने दिंडी सोहळ्याची सांगता होणार आहे. ११ दिवसांचा पायी प्रवाससुमारे २५० किलोमीटरच्या या पायी दिंडी सोहळ्यात सुमारे दोन हजार भाविक सहभागी होतात. विशेष म्हणजे या पायी दिंडीत केवळ पुरुष भाविकच सहभागी होतात. ११ दिवस पायी प्रवास केल्यानंतर भाविक श्री क्षेत्र बाबीर बुवा देवस्थान, रुई येथे पोहोचतात.
बाबीर बुवा देवस्थान पदयात्रेचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 9:45 PM
सिन्नर : सिन्नर व संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या व श्री बाबीर बुवांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र बुवाजीबाबा देवस्थान डिग्रस ते श्री क्षेत्र बाबीर बुवा देवस्थान, रुई, ता. इंदापूर या पदयात्रेचे मंगळवारी (दि. २६) प्रस्थान झाले. सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती दिंडी चालक उमाजी महाराज पुणेकर यांनी दिली.
ठळक मुद्देदिंडी सोहळा : जिल्ह्यातून सहभागी होतात शेकडो भाविक