खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे सोमवारी सायंकाळी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज दिंडी सोहळ्याचे टाळ, मृदंग, हरिनामाच्या जयघोषात आगमन झाले. गावाच्या वेशीवर कामगार पोलीसपाटील भारत बोºहाडे व सरपंच शोभा आंधळे यांनी पालखीचे पूजन केले. लोकनेते गोपीनाथ मुंडे युवा मंच, शिवस्वराज्य प्रतिष्ठान व वारकरी संप्रदाय यांनी वारकऱ्यांची व्यवस्था केली. सोमवारी रात्रीचा मुक्काम झाल्यानंतर मंगळवारी सकाळी पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले.दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी व वारकºयांनी गर्दी केली होती. पालखी गावातील मारूती मंदिरात ठेवण्यात आली. यानंतर मंदिराच्या पटांगणात सर्व ग्रामस्थ व वारकºयांच्या उपस्थितीत सामूहिक आरती करण्यात आली. यानिमित्त गावातील भजनी मंडळीने कीर्तनाचे आयोजन केले होते. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. वारकºयांनी भाकरी व आमटीचा आस्वाद घेतला. रात्रभर भजन सुरू होते. पहाटे ५ वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी ६ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उदय सांगळे, पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड यांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले. सकाळी साडेसात वाजता पालखीचे प्रस्थान झाले.दोन दिवसांपासून ग्रामस्थांनी दिंडीच्या स्वागतासाठी तयारी केली होती. गावातील साफसफाई, पथदीप दुरुस्ती, गावातील जुन्या ग्रामपंचायत शाळेच्या खोल्याची साफसफाई, पिण्याच्या पाण्याची सोय, मंदिरांना विद्युतरोशणाई आदींसह तयारी करण्यात आली होती.भजनी मंडळ, तरुणांनी केले स्वागतसोमवारी दुपारी ४ वाजता दातली येथे रिंगण पार पडल्यानंतर दिंडी खंबाळेच्या दिशेने निघाली. मार्गात ठिकठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास पालखीने गाव शिवरात प्रवेश केला. गावातील भजनी मंडळ, तरुणांनी स्वागत करून पालखी खांद्यावर घेऊन वाजत गाजत गावात आणली.
खंबाळेहून पालखीचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:27 AM
खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे सोमवारी सायंकाळी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज दिंडी सोहळ्याचे टाळ, मृदंग, हरिनामाच्या जयघोषात आगमन झाले. गावाच्या वेशीवर कामगार पोलीसपाटील भारत बोºहाडे व सरपंच शोभा आंधळे यांनी पालखीचे पूजन केले. लोकनेते गोपीनाथ मुंडे युवा मंच, शिवस्वराज्य प्रतिष्ठान व वारकरी संप्रदाय यांनी वारकऱ्यांची व्यवस्था केली. सोमवारी रात्रीचा मुक्काम झाल्यानंतर मंगळवारी सकाळी पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले.
ठळक मुद्देसंतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज : हरिनामाचा जयघोषठिकठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली