गत बारा वर्षांपासून एकदाही खंड न करता, यंदाच्या १३व्या वर्षीही येथील ओम साईराम सेवाभावी मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष तानाजी भोर यांच्या मार्गदर्शनाखाली साई पालखी यंदाच्या वर्षीही शिर्डीकडे रवाना झाली. मात्र, कोविड फैलाव लक्षात घेत, काही भाविकच या पादुका भेट सोहळ्यात सहभागी झाले आहेत. सकाळी रेणुका माता मंदिरात उत्तम कासार, संस्थापक अध्यक्ष तानाजी भोर, उषा भोर, दिनेश गोविल, नामदेव सूर्यवंशी, अनिकेत भोर, प्रशांत वऱ्हाडे, सागर वाजे, मंगेश परदेशी यांच्या उपस्थितीत साईबाबांच्या पादुका, पालखी पूजन व त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी सर्व साईभक्तांनी साईबाबांच्या नावाचा जयघोष केला व पालखीसह पादुका खंड पडू नये, म्हणून शिर्डीच्या दिशेने रवाना झाली. यावेळी दर्शन दुबे, प्रमोद कुवर, संजय आडके, सचिन गुळवे, अरुण बनकर, स्वाती पवार, प्रियांका यादव, मीरा ठोंबरे, सरला भोर आदीं भाविक सहभागी झाले होते.
(फोटो ३० पालखी)