शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीचे प्रस्थान

By admin | Published: June 20, 2016 11:38 PM

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीचे प्रस्थान

 त्र्यंबकेश्वर : हरिनामाचा जयघोष करीत संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी आज अपूर्व उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान झाले.या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यातून सुमारे ४० ते ५० हजार भाविक दाखल झाले होते. आज, सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता चांदीचा रथ निवृत्तिनाथांच्या पादुका घेऊन पंढरपूरकडे निघाला. आषाढी एकादशीच्या वारीसाठी देशातून संत-माहात्म्यांच्या दिंड्या पंढरपूरकडे कूच करीत असतात. पंढरपूर हे संतांचे माहेर आहे. संत निवृत्तिनाथांची पालखी २४-२५ दिवसांचा पायी प्रवास करीत दि. १३ जुलै रोजी पंढरपूरला पोहोचेल. टाळ-मृदंगाच्या गजरात तल्लीन पालखी निवृत्तिनाथ समाधी संस्थानपासून मार्गस्थ झाली. कुशावर्तावर पालखी आल्यानंतर नगराध्यक्ष विजया लढ्ढा, त्यांचे पती दीपक लढ्ढा यांच्या हस्ते निवृत्तिनाथांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. या विधिवत पूजेनंतर पादुकांना कुशावर्तात स्नान घडविण्यात आले. यावेळी आरती पुष्पांजली झाल्यानंतर पादुका रथात स्थानापन्न करण्यात आल्यानंतर रथ पुढे हलविण्यात आला. रथाचे सारथी माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे, त्यांचे पुत्र अजय अडसरे बैलांना सावरीत होते. मिरवणुकीच्या शोभायात्रेत रथापुढे टाळकरी, विणेकरी-मृदंगवादक आदिचे अभंग सुरू होते. त्यापुढे तुळशी वृंदावन घेऊन असंख्य महिला होत्या. पुढे नृत्य करणारे घोडे त्यापुढे ढोलताशा, बॅण्ड पथक अशा थाटात दिंडीचे स्वरूप होते. (वार्ताहर)