शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

२७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

By admin | Published: March 06, 2017 12:27 AM

येवला : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील पाच गट व दहा गणांत निवडणूक लढवीत असलेल्या ६४ पैकी २७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

येवला : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील पाच गट व दहा गणांत निवडणूक लढवीत असलेल्या ६४ पैकी २७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. गटाच्या पाच जागांसाठी १९ उमेदवार, तर पंचायत समिती गणांच्या दहा जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. यात अनेकांचा धक्कादायक पराभव झाला असून, काहीना तर अपेक्षेपेक्षा खूपच कमी मते मिळाली. तब्बल ४२ टक्के उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याने त्यांना आपली अनामत रक्कमदेखील वाचवता आलेली नाही. ज्याचा पक्षाशी संबंध नाही अशा उमेदवारांना कुठलाही प्रवेश न करता भाजपा व कॉँग्रेसने उसनवारीने उमेदवारी दिली होती. त्यामुळे निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या कमी होती. हे सगळेच मुख्य उमेदवार नसल्याने मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे मतदानाच्या आकडेवारीत समजते. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून उमेदवारी करत अंदरसूल गटातील बाबासाहेब डमाळे, नागडे गणातील दादा मोरे व मुखेड गणातील सोनाली शिंदे या भाजपाच्या तीन तर पाटोदा गणातील आशालता पाटील व चिचोंडी गणातील लक्ष्मी गोसावी या कॉँग्रेसच्या उमेदवारांनी अधिक मते मिळवत आपली अनामत रक्कम वाचवण्यात यश मिळविले आहे. मात्र बाकींची अनामत रक्कम शासन तिजोरीत जमा झाली आहे.कॉँग्रेसचे अनामत रक्कम जप्त झालेले उमेदवार व त्यांना मिळालेले मते पुढीलप्रमाणे- पाटोदा गटातील उस्मान शेख (२४५७), राजापूर गट- भारती पुणे (४६१), अंदरसूल गट-रावसाहेब लासुरे (४४९), मुखेड गट- संगीता अहेर (१३२१), तर गणांतील उमेदवार पुढीलप्रमाणे- धुळगाव गणातील सूर्यकांत गोसावी (६२९), राजापूर गण- आशा झाल्टे (२५५), अंदरसूल गण- शिवाजी धनगे (८४८), नागडे गण- मीरा माळी (१९०), मुखेड गण- छाया दिवटे (३३०) यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. मागेल त्याला उमेदवारी हा अजेंडा वापरला; मात्र प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रि येत पक्षाकडे कोणीही लक्ष न दिल्याने तालुक्यात कॉँग्रेसला एकही जागा मिळविात आली नाही. मात्र बऱ्याच उमेदवारांवर अनामत जप्तीची नामुष्की ओढवली. बसपाचे अनामत जप्त झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात मिळालेले मते)े -धुळगाव गणातून विक्रांत गायकवाड (२०९), नगरसूल गण- धर्मा पगारे (१७२), राजापूर गण- कांताबाई पगारे (३०२), चिचोंडी गण- अर्चना सोनवणे (३०४) या उमेदवारांचा समावेश आहे. अनामत जप्त झालेले अपक्ष उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात मिळालेली मते) राजापूर गट- रेन्ना तांबोळी (१४७), तर गणातून धुळगाव गण- बाबासाहेब पवार (२७५), सायगाव गण- तान्हुबाई गायकवाड (३०९), नागडे गण- संतोष निकम (२३४), मुखेड गण- वैशाली वेळंजकर (१३७) यांच्यावर अनामत जप्तीची नामुष्की ओढावली आहे. (वार्ताहर)