औंदाणे : बागलाण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची हक्काची फरक बिलांची रक्कम एक वर्षापासून दोन कोटी रुपये मंजूर होऊनही अद्याप मिळाली नसल्याने ३१ मार्चपर्यंत शिक्षकांच्या खात्यावर रक्कम जमा करावी या मागणीचे निवदेन बागलाण तालुका शिक्षक संघाने गटविकास आधिकारी जितेंद्र देवरे यांना देण्यात आले. बागलाण तालुका शिक्षक संघाने वेळोवेळी निवेदन, भेटी घेऊनही दोन ते तीन वर्षापासूनचे एकस्तर, मेडिकल, सातव्या वेतन आयोगाचे हप्ते, वाढीव वेतनवाढ, एकदिवसीय वेतन, उत्कृष्ट कामाचा फरक, पगाराची फरक रक्कम आदी बिलांची रक्कम जवळ जवळ मार्च २०१७ ला दोन कोटी रक्कम मंजूर होऊन वर्ष होत आले तरी आतापर्यंत शिक्षकांच्या खात्यावर फरकाची रक्कम जमा झाली नाही. गटविकास अधिकारी यांना प्राथमिक शिक्षक संघाने दिलेले निवेदन कक्ष अधिकारी शार्दूल पाटील यांनी स्वीकारले. यावेळी बागलाण प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस देवीदास पवार, कोषाध्यक्ष दीपक सोनवणे, कार्याध्यक्ष भीमराव कापडणी, सुरेश पगार, आबा पवार, बच्छाव, नीलेश पाटील, हेमंत महाले, दिनेश सोनवणे, प्रदीप बोरसे, विजय पगार, सुनील कापडणीस, बालाजी पाटील, शिवाजी निमसे, सुरेश ठाकरे, शरद गांगुर्डे, योगेश पगार, चैत्रराम पवार, रवींद्र गायकवाड, विनोद गायकवाड, तुंगू चौधरी, महेंद्र अबुमेकर, रवींद्र चौरे, मगन गावीत, जगनाथ जगताप आदी शिक्षक हजर होते.
फरकाची रक्कम जमा करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:11 AM