नाशिक : एखादे झाड तोडण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केल्यास त्या नागरिकास किंवा विकासकास एकाच्या बदल्यात पाच झाडे लावावी लागणार आहेत मात्र या नियमाच्या पलीकडे जाऊन आता अशा प्रति एका झाडाच्या तीन वर्षांपर्यंत संवर्धन व्हावे यासाठी अडीच हजार रुपयांची ठेव तीन वर्षांकरिता महापालिकेत ठेवावी लागणार आहे. त्यामुळे आता नियमानुसार वृक्षतोडदेखील महागात पडणार आहे.वृक्षप्राधीकरण समितीच्या येत्या २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असली तरी अनेकदा धोकादायक झाडे असल्याने ती तोडावी लागतात. त्यासाठी महापालिकेत अर्ज केल्यानंतर त्यासाठी रीतसर पाहणी करून तसेच प्रत्यक्ष पाहणी करून परवानगी दिली जाते. त्यानंतर एक झाड तोडले तर पाच झाडे लावावी लागतात. परंतु याकडे आता महापालिकेने गांभीर्याने पाहण्याचे ठरविले आहे. त्यामुळे एका झाड लावून त्याचे संवर्धन होते किंवा नाही हे पाहण्यासाठी तीन वर्षांकरिता अडीच हजार रुपयांची ठेव घेतली जाणार असून, वृक्षाचे जतन केल्याचे सिद्ध झाल्यासच ही रक्कम परत दिली जाणार आहे. हा नियम सामान्य नागरिक आणि विकासकांसाठीदेखील लागू राहणार आहे. वृक्षतोड केल्यानंतर झाडे लावायची इच्छा असेल, परंतु संबंधितांकडे त्यासाठी जागाच नसेल तर महापालिका त्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे. परंतु झाड तोडणाºयाची पुन्हा झाड लावण्याची इच्छा नसेल तर प्रति झाड अडीच हजार रुपये याप्रमाणे वृक्ष निधी म्हणून घेण्यात येणार आहे.मनपाच्या कामासाठीही सारखाच नियममहापालिकेच्या एखाद्या भूखडांवर विकासकामे करतानादेखील वृक्षतोड करावी लागते. मात्र, त्यासाठीदेखील आता नियम असून, अशाप्रकारची वृक्षतोड करावी लागल्यास बांधकाम विभागाकडून तसा प्रस्ताव सादर केला जाईल. ज्या ठेकेदाराला काम मिळाले आहे. त्यालादेखील एक झाड तोडायचे झाल्यास पाच झाडे लावण्याची हमी द्यावी लागेल त्याचप्रमाणे एका झाडासाठी पाच हजार रुपयांची ठेव द्यावी लागेल. ठेकदाराने वृक्षलागवडीची असमर्थता व्यक्तकेल्यास त्याच्याकडूनदेखील ही रक्कम वृक्षनिधी म्हणून घेण्यात येणार आहे.
वृक्षलागवडीनंतर ठेवावी लागणार अडीच हजारांची ठेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 2:01 AM
एखादे झाड तोडण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केल्यास त्या नागरिकास किंवा विकासकास एकाच्या बदल्यात पाच झाडे लावावी लागणार आहेत मात्र या नियमाच्या पलीकडे जाऊन आता अशा प्रति एका झाडाच्या तीन वर्षांपर्यंत संवर्धन व्हावे यासाठी अडीच हजार रुपयांची ठेव तीन वर्षांकरिता महापालिकेत ठेवावी लागणार आहे. त्यामुळे आता नियमानुसार वृक्षतोडदेखील महागात पडणार आहे.
ठळक मुद्देउद्यान विभागाचा प्रस्ताव : वृक्षतोड करणे पडणार महागात