नाशिक : नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या १८ उमेदवारांपैकी १६ उमेदवारांना आपली अनामत रक्कमदेखील वाचविता आली नाही. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाºया समीर भुजबळ यांचा अपवाद वगळता इतर सर्व उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली आहे. याबाबतचे परिपत्रक जिल्हा निवडणूक शाखेने काढले आहे.निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वैधमतांच्या एकषष्ठांश मते न मिळाल्यास उमेदवाराने जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. या नियमानुसार एकूण १६ उमेदवारांना आपली अनामत रक्कम गमवावी लागली आहे. त्यामध्ये राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवरांचादेखील समावेश आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात दि. २३ रोजी झालेल्या मतमोजणीत वैध मतांची संख्या ११ लाख १४ हजार २५२ इतकी आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे हे विजयी झाले आहेत, तर राष्टÑवादीच्या समीर भुजबळ यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली. अन्य उमेदवारांना मात्र वैधमतांच्या एकषष्ठांश म्हणजेच १ लाख ८५ हजार ७०९ मते न मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम सरकार जमा करण्यात आली.निवडणूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार अॅड. वैभव शांताराम अहिरे (५७१९), सोनिया रामनाथ जावळे (६९५२), पवन चंद्रकांत पवार (१,०९,९८१), विनोद वसंत शिरसाठ (१३६२), शिवनाथ विठोबा कासार (८६६), संजय सुखदेव घोडके (८९९), शरद केरू अहेर (१३८७), प्रकाश गिरीधर कनोजे (९२२), सिंधूबाई रवींद्र केदार(१७३६), अॅड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे(१,३४,५२७), देवीदास पिराजी सरकटे (४२७४), धनंजय अनिल भावसार (१८८५), प्रियंका रामराव शिरोळे (२२०६), विलास मधुकर देसले (३८२६), शरद दामू धनराव (८३५), सुधीर श्रीधर देशमुख (१८८१) यांची अनामत रक्कम जप्त झालेली आहे.१४ उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतदानया निवडणुकीत ६९८० इतके नोटाला मतदान झालेले आहे. निवडणूक रिंगणातील १४ उमेदवार असे आहेत की त्यांना नोटा पेक्षाही कमी मतदान झालेले आहे. भारतीय ट्रायबल पार्टीच्या सोनिया जावळे यांनाच फक्त ६,९५२ म्हणजे नोटाच्या जवळपास मते मिळाली आहेत. अन्य उमेदवारांना ८०० ते ४ हजारापर्यंतच मते मिळाली.तीन लाखांची रक्कमनाशिक लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठीची अनामत रक्कम भरलेली आहे. १२ हजार ५०० आणि २५,००० याप्रमाणे उमेदवारांनी अनामत रक्कम भरलेली असून, जप्त करण्यात आलेली रक्कम ३ लाख २५ हजार इतकी आहे.
१६ उमेदवारांची अनामत रक्कम झाली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 1:33 AM