येवला : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटीत १९ कोटी रु पयांच्या ठेवी आहेत. गेल्या चार वर्षांपासून ठेवींच्या मुदती केव्हाच संपल्या आहेत, परंतु अद्यापही ठेव परत मिळत नाही. या ठेवी परत मिळाव्यात म्हणून येवल्यासह महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण, थेट मोर्चासह अनेक आंदोलने झाली. जळगाव मुख्य शाखेत प्रशासक नेमला आहे. तरीही वारंवार चकरा मारूनही पैसे मिळत नाही. यामुळे हवालदिल व त्रस्त झालेले व संभ्रमात सापडलेल्या ठेवीदारांनी थेट जळगाव येथे राज्यात अशोक मंडोरे, संजय सोनवणे यांच्यासह अवसायक, राज्य सरकार, केंद्र सरकार यांना जागे करण्यासाठी ठेवीदारांनी गुरुवार ३१ मे २०१८ रोजी आक्र श मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. जळगाव बसस्थानक शेजारी, महात्मा गांधी उद्यान येथे जमण्याचे आवाहन केले आहे. ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह कशा पद्धतीने मिळविता येतील याबाबत आता पुन्हा विचारमंथन सुरू झाले आहे. सर्वदूर कोट्यवधी रु पयांच्या ठेवी असणाऱ्या रायसोनी पतसंस्थेचे येवला शहर व तालुक्यात बाराशे ठेवीदार असून, १९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या ४ वर्षांत येवल्यात एकदिवसीय उपोषणासह अनेक आंदोलने झाली. जळगाव येथे तीनशे ठेवीदारांचा मोर्चादेखील निघाला, यात येवल्याचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता, परंतु यश आले नाही. राज्य सरकारदेखील याबाबत हतबल झाल्याने ठेवीदारांनी दिल्लीपर्यंत धाव घेतली. संजीव सोनवणे, प्रल्हाद कोतवाल, सुभाष विसपुते, कृष्णा शिंदे, प्रताप देशमुख, विजय सानप, विनोद गोसावी, गुमानसिंग परदेशी, सोमनाथ खंदारे, प्रतिबाला पटेल, अविनाश देसाई, राजू क्षत्रिय, विलास शिंदे यांच्यासह अनेक ठेवीदार यासाठी पाठपुरावा व संघर्ष करीत आहेत. ठेवीच्या भरवशावर मुला-मुलींचे शिक्षण, आजारपण, लग्न ही सारी कामे लांबणीवर पडली आहेत. आता अखेर या ठेवीदारांनी थेट पंतप्रधान व केंद्रीय वित्तमंत्री यांना साकडे घालण्याचे नियोजन या बैठकीत केले आहे. आम्हाला आमच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन या ठेवीदारांकडून केले आहे. बुडतीच्या डोहात फसल्याने त्रस्त झालेल्या ठेवीदारांनी आपल्या कष्टाचा पैसा मिळावा म्हणून ठेवीदार संघटना गेल्या चार वर्षांपूर्वी स्थापन केली. या दृष्टीने योजनाबद्ध कार्यक्र म आखून उपोषण व संघर्षाची भूमिका घेतली होती, परंतु नियोजनबद्ध ठोस कृतियुक्त पाठपुरावा झाला नाही. कृतियुक्त कार्यक्र म तयार करून संघर्ष करण्याची तयारी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ४अनेक ठेवीदार आजाराने बिछान्यावर पडून आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रि या करावयाची आहे. पण सर्व पैसे बीएचआरमध्ये ठेवले गेले आणि हे पैसे बुडाले असल्याची त्यांना खात्री झाली आहे. संघर्षातून कष्टाचे पैसे परत मिळविण्यासाठी अखेरचा निर्णायक लढा देणार असल्याचा संकल्प ठेवीदारांनी केला आहे. संस्थेच्या ठेवी बुडण्याच्या धास्तीने काहींनी आम्ही आत्महत्या करावी काय? त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे. पैसे बीएचआरमध्ये ठेवले गेले आणि हे पैसे बुडण्याच्या मार्गावर आहेत. केवळ ८० टक्के रक्कम का होईना परत द्या अशा संतप्त भावना बैठकीत व्यक्त केल्या आहेत. ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष गुमानसिंग परदेशी, सचिव प्रल्हाद कोतवाल, रंगनाथ खंदारे, अविनाश देसाई, सुभाष विसपुते, राजेश रामचंद्र पटेल, सुरेश हिराचंद पटेल, ईश्वर सूर्यवंशी, रमेशचंद्र राठी, इक्बाल पटेल, मिलिंद दातरंगे, वसंत गोसावी, सुभाष साळवे यांच्यासह ठेवीदार एल.झेड. वाणी, नामदेव कोल्हे, सदानंद बागुल यांच्यासह शेकडो ठेवीदार आक्रोश मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती संजीव सोनवणे यांनी दिली.
ठेवीदार राज्यव्यापी आक्र ोश मोर्चाच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:10 AM