ओझर : १ जुलै रोजी येथील दहा ते पंधरा फळविक्रेते, भाजीविक्रेते, तसेच दुकानदारांनी स्वतःहून त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक संकलन केंद्र साईधाम येथे व प्रत्यक्ष मुख्याधिकारी दालनामध्ये येऊन प्लास्टिक सुपुर्द करून एक आदर्श पाऊल उचलत प्लास्टिक बंदी मोहिमेसाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.नगर परिषद हद्दीमध्ये दिनांक १ जुलै २०२१ पासून प्लास्टिक व्यवस्थापनांतर्गत शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, तसेच प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रुल्स २०१६ अन्वये ओझर नगर परिषद हद्दीमध्ये प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे. पर्यावरण संतुलन राहावे व सार्वजनिक आरोग्य अबाधित राहावे यासाठी प्लास्टिक व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक व दुकानदारांची बैठक घेऊन प्रबोधन करण्यात आले होते, तसेच घरोघरी प्लास्टिक व्यवस्थापनाबाबत प्रसिद्धीपत्रके वाटप करण्यात आली आहेत. जाहीर प्रसिद्धीदेखील करण्यात आलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी व्यावसायिकांनी यामध्ये सहभाग घेऊन दहा ते पंधरा फळविक्रेते व भाजीविक्रेते, तसेच दुकानदारांनी स्वतःहून त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक संकलन केंद्र येथे जमा केल्या आहेत. यामध्ये सारिका जाधव, विजय गाडेकर, उषा कोरडे, अलका वाघ, आशाबाई साळवे, संगीता चव्हाणके, विष्णू भडके, अशा व्यावसायिकांचा समावेश होता.
प्लास्टिक बंदीसाठी स्वतःहून प्लास्टिक पिशव्या केल्या जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:18 PM
ओझर : १ जुलै रोजी येथील दहा ते पंधरा फळविक्रेते, भाजीविक्रेते, तसेच दुकानदारांनी स्वतःहून त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक संकलन केंद्र साईधाम येथे व प्रत्यक्ष मुख्याधिकारी दालनामध्ये येऊन प्लास्टिक सुपुर्द करून एक आदर्श पाऊल उचलत प्लास्टिक बंदी मोहिमेसाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.
ठळक मुद्देओझर नगर परिषद हद्दीत व्यावसायिकांचे आदर्श पाऊल