जागतिक पाणथळ दिन विशेषनाशिक : निफाड तालुक्यातील चापडगाव येथील रामसर दर्जाच्या नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील जलाशयावर सध्या देशी-विदेशी स्थलांतरित पाहुण्यांचा मेळा भरला आहे. थंडीचा कडाका मागील पंधरवाड्यापासून वाढल्याने कोरोनासोबतच ह्यबर्ड फ्ल्यूह्ण सारख्या आजाराचे सावट झुगारत पक्षी तीर्थावरील ह्यहिवाळी संमेलनह्ण चांगलेच बहरलेले दिसून येत आहे. पाणथळ अधिवासात राहणाऱ्या ७१ प्रजातींच्या पक्ष्यांची येथे नुकतीच नोंद करण्यात आली आहे.कोरोनाच्या सावटामुळे नांदुरमध्यमेश्वरचे दरवाजे यावर्षी उशिराने खुले करण्यात आले. या हंगामातील पाचवी मासिक पक्षी प्रगणना नाशिक वन्यजीव विभागाकडून नुकतीच पार पाडण्यात आली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या पक्षी तज्ज्ञांनी घेतलेला सहभाग हे यंदाच्या पक्षी गणनेचे वैशिष्ट्य होते. अभयारण्य क्षेत्रातील चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, कोठुरे, कुरुडगाव, काथरगाव शिवारात तसेच गोदावरीच्या पात्रांभोवती वनरक्षकांसह, स्थानिक गाईड, पक्षीमित्र, वन्यजीव अभ्यासकांनी सहभाग घेतला. पक्षी निरीक्षणादरम्यान पाणस्थळावरील विविध पाणपक्षी, गवताळ प्रदेश तसेच झाडांवरील पक्ष्यांच्या नोंदी यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, ७१ प्रजातींच्या सुमारे ३१ हजार ६७७ पाणस्थळी पक्ष्यांचे संमेलन चांगलेच रंगल्याचे यावेळी दिसून आले. बर्ड फ्ल्यू आजाराचे सावट असले तरीदेखील नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी मात्र अद्याप या आजारापासून सुरक्षित असल्याने हे शुभ वर्तमान मानले जात आहे. पक्ष्यांच्या हालचालींवर वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करडी नजर ठेवली जात आहे. सहायक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपाल अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभयारण्य क्षेत्रातील पक्ष्यांची गणना पूर्ण करण्यात आली.पाणथळी पक्ष्यांचे माहेरघरनांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य हे पाणथळी पक्ष्यांचे आशियाई मार्गातील महत्वाचे ह्यमाहेरघरह्ण आहे. सध्या येथे सामान्य करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, वारकरी, जांभळा बगळा, राखी बगळा, तसेच स्थलांतरित बदकांपैकी स्पॉट बिल डक, तरंग, चक्रवाक, गढवाल, भुवई, लालशिरी यांसह चमचा (स्पून बिल), कमळपक्षी, शेकाट्या, नदी सुरय, चित्रबलाक यांच्यासह मार्श हॅरियर, ऑस्प्रे ईगल सारखे शिकारी पक्षीही येथे बागडताना दिसून येत आहेत.ह्यबीएनएचएसह्णकडून पक्षी अभ्यासाचे धडेनांदुरमध्यमेश्वर अभयारण्यातील वनरक्षक, गाईड, पक्षीप्रेमी, स्वयंसेवक, वनरक्षक यांना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने नाशिक वन्यजीव विभागाकडून पक्षी अभ्यासाविषयीचे धडे देण्यात आले. पाच दिवसीय कार्यशाळेत सोसायटीचे डॉ. राजू कसांबे, पक्षीतज्ज्ञ तुहिना कट्टी, नंदकिशोर दुधे, प्रियंका जुंदरे आदींनी नांदुरचे पाणथळ, गवताळ अधिवासाचे महत्व, पक्षी निरीक्षण, पक्षी ओळख, रामसर पाणथळी जागांचे महत्व, बर्ड रिंगिंग, बँडींग, प्रगणना, माळरानातील पक्षीजीवन, रानपिंगळ्याचा पुनर्शोध अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
३१ हजार देशी-विदेशी पाहुण्यांची मांदियाळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 9:34 PM
नाशिक : निफाड तालुक्यातील चापडगाव येथील रामसर दर्जाच्या नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील जलाशयावर सध्या देशी-विदेशी स्थलांतरित पाहुण्यांचा मेळा भरला आहे. थंडीचा कडाका मागील पंधरवाड्यापासून वाढल्याने कोरोनासोबतच ह्यबर्ड फ्ल्यूह्ण सारख्या आजाराचे सावट झुगारत पक्षी तीर्थावरील ह्यहिवाळी संमेलनह्ण चांगलेच बहरलेले दिसून येत आहे. पाणथळ अधिवासात राहणाऱ्या ७१ प्रजातींच्या पक्ष्यांची येथे नुकतीच नोंद करण्यात आली आहे.
ठळक मुद्देरामसर दर्जाचे पाणथळ : पक्षीतीर्थ नांदुरमध्यमेश्वरच्या जलाशयावर हिवाळी संमेलन बहरले