यावेळी केंद्र शासनाने केलेल्या नविन कृषी कायदा मागे घ्यावा, महाराष्ट्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करणारा अध्यादेश ताबडतोब काढावा, शासनाने हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत म्हणजेच हमीभाव मिळावा यासाठी स्पष्ट तरतूद करून कठोर कार्यवाही करावी, रेल्वेच्या खासगीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने तात्काळ रद्द करावा यासारख्या अनेक मागण्यांचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला होता. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभिर्याने विचार करावा अन्यथा देशात अराजकता माजेल आणि यास सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे चेतन वनिस, शेखर बच्छाव, दादा खरे, आनंद दाणी, दीपक पाटील, जितेंद्र सरदार, राहुल येशी, किशोर म्हसदे, रोशन खरे, प्रशांत गरुडकर, शरीफ कुरेशीसह तालुक्यातील व शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीतर्फे सटाण्यात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 3:42 PM