खडकी : प्रधानमंत्री किसान सन्माननिधी अनुदानाचे डिसेंबर अखेर मोठ्या प्रमाणात लाभार्थी वंचित राहिले असून, संबंधित कर्मचारी व अधिकारी उदासिन असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.गतवर्षी निवडणुका होण्याअगोदर शेतकऱ्यांना मोठी भेट देण्यात आली होती. त्यांची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू होती. एका वर्षात तीन टप्प्यात सदर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. शेतकºयांना सातबारा उतारा, आधारकार्ड व खाते क्रमांक यानुसार नोंदणी करण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयात शेतकºयांनी आपले कागदपत्र जमा केले आहेत; मात्र अद्यापही शेतकरी सदर अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत.कर्जमाफी, पीक नुकसान अनुदान, पीकविमा, प्रधानमंत्री किसान सन्माननिधी यासारख्या योजना शेतकºयांच्या हितावह व मदत अनुदान स्वरूपात शासनाने सुरू केल्या आहेत. त्यानुसार शेतकºयांना त्याची मदतही होणार आहे. कारण दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे थकलेला शेतकरी उभा राहणार आहे.यावर्षी मोठा पावसाळा असूनही पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. पिकांना भाव असलातरी हातात उत्पादन नसल्याने कर्जमाफी सारखे मोठे निर्णय शेतकºयाला तारणार आहे, मात्र संबंधित यंत्रणेची दक्षता यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.पीक नुकसान अनुदानाची रक्कम वेळेत मिळणार नसल्याने सर्व योजना वेळ निघून गेल्यानंतरच मदतीचा हात पुढे करीत असल्याने यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे.शेतकºयांना लवकरच होणार फायदाआॅनलाइन प्रस्ताव दाखल योजना सोयीची आहे. यंत्रणा चालविण्यामुळे प्रशिक्षित कर्मचाºयांची गरज आहे. पीककर्ज योजना ५ वर्षांपासून कार्यरत आहे. तांत्रिक विभाग आधार जोडणी, बँक खाते जोडणी, पॅनकार्ड, मोबाइल नंबर यामुळे एकच कागदपत्र जोडणीने अनुदान खात्याला देण्यातही यंत्रणा सक्षम केल्याचा अनुदानाचा लाभ शेतकºयांना पोहोचणार आहे. त्याचा फायदाही शेतकºयांना लवकर होणार आहे.
अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:23 PM
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी अनुदानाचे डिसेंबर अखेर मोठ्या प्रमाणात लाभार्थी वंचित राहिले असून, संबंधित कर्मचारी व अधिकारी उदासिन असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.
ठळक मुद्देमालेगाव : किसान सन्माननिधी लाभार्थींची तक्रार