Video: अजित पवारांनी राज ठाकरेंची केली नक्कल; नाकाला नॅपकीन लावला अन् म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 10:09 PM2022-05-02T22:09:36+5:302022-05-02T22:09:45+5:30

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज राज ठाकरेंवर निशाणा साधत त्यांच्यावर पलटवार केला आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar has criticized MNS chief Raj Thackeray by mimicking him | Video: अजित पवारांनी राज ठाकरेंची केली नक्कल; नाकाला नॅपकीन लावला अन् म्हणाले...

Video: अजित पवारांनी राज ठाकरेंची केली नक्कल; नाकाला नॅपकीन लावला अन् म्हणाले...

Next

नाशिक- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी १ मे रोजी झालेल्या औरंगाबादच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. शरद पवार हे त्यांना जे सोयीचे आहे तेच वाचतात. जेम्स लेन आणि दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांचा संबंध दाखवून मराठा समाजाची माथी भडकविण्याचे काम शरद पवारांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरे यांनी घराघरात पोहोचविले, परंतु ते ब्राह्मण असल्याने त्यांचा द्वेष केला, असा आरोपही राज ठाकरेंनी शरद पवारांवर केला होता.

राज ठाकरेंच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेते त्यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज राज ठाकरेंवर निशाणा साधत त्यांच्यावर पलटवार केला आहे. विविध राजकीय नेत्यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडविणाऱ्या राज ठाकरेंचीच नक्कल करत आता अजित पवारांनी निशाणा साधला आहे. 

राज ठाकरे कधी दुपारी भर उन्हात सभा घेत नाहीत. सूर्य मावळला, संध्याकाळ झाल्यानंतर वातावरण चांगले झाले की मग हे सभा घेतात. मग ते नॅपकिनने तोंड पुसत असतात. ( यावेळी अजित पवार यांनी नॅपकीन मागवला आणि राज ठाकरे यांची तोंड पुसण्याची नक्कल केली) ते काय पुसत असतात काय माहीत. काय एकदाचं आहे ते पुसून घे आणि मग बोल ना. सारखं सारखं काय नाकाला नॅपकिन लावायाचा, असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.

दरम्यान, लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपले प्रश्न सोडवते असा विश्वास लोकांना वाटायला हवा असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमधील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण आणि शहर येथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, पक्षांतर्गत वाद बाजूला ठेवून आगामी निवडणुकीत भुजबळांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करा. काही मंडळी विनाकारण दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करून विकासकामांवर लक्ष द्यायला हवे, असं अजित पवार म्हणाले.

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar has criticized MNS chief Raj Thackeray by mimicking him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.