नाशकातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 07:28 PM2020-01-31T19:28:03+5:302020-01-31T19:31:20+5:30
नाशिक शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना जिल्हा रुग्णालय जिल्हाभरातील रुग्णांसाठी अपुरे पडत असल्याचे नमूद करीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शासनाची जागा उपलब्ध असून याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
नाशिक : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांच्या सोयीकरिता नाशिक जिल्ह्यात शासकीय वैदकीय महाविद्यालय उभारावे असे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्रीराम शेटे, आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदि उपस्थित होते.
नाशिक शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना जिल्हा रुग्णालय जिल्हाभरातील रुग्णांसाठी अपुरे पडत असल्याचे नमूद करीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शासनाची जागा उपलब्ध असून याठिकाणी शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या ठिताणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले तर जिल्हा रुग्णालयाचा भार हा कमी होऊन रुग्णांना उपचारासाठी पर्याय उपलब्ध होऊ शकतील. त्याचप्रमाणे संपूर्ण नाशिक विभागीतील विद्यार्थ्यांनाही वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय उपलब्ध होऊ शकणार असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात यावे असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलल्या निवेदनाच्या माध्यमातून घातले आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, प्रदेश सरचिटणीस श्रेयांश सराफ, प्रदेश चिटणीस डॉ. सागर कारंडे, जिल्हा कार्याध्यक्ष आकाश कदम, निमा विद्यार्थी अध्यक्ष डॉ. सोनल पाटील आदी उपस्थित होते.