नाशिक : विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची राज्याच्या शिक्षण सहसंचालकपदी पदोन्नती झाली असून, त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी व वर्ग एक शिक्षणाधिकारी म्हणून नितीन उपासनी यांनी शिक्षण विभागाचे कामकाज पाहिले असून, जिल्हा परिषदेत माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, अतिरिक्त शिक्षणाधिकारी यासह महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिकचे सहायक सचिव व विभागीय सचिव म्हणूनही त्यांनी कामकाज केले आहे. सध्या ते नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत असून, त्यांना शिक्षण विभागाने पदोन्नती देत राज्याच्या सहायक शिक्षण संचालकपदावर पदोन्नती देत मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. पुढील आठवडाभरात ते पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.