देशमाने : गावालगत वाहणाऱ्या गोई नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा राजरोस सुरु असून महसूल व पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.येवला तालुक्यातील सर्वात मोठी नदी असून एकेकाळी वाळूचे मोठे आगार असलेली नदी, मात्र सातत्याने सुरु असलेला अवैध वाळू उपस्यामुळे वाळू चोरांनी आता नदीपात्राचे किनारे कोरण्यास सुरवात केल्याने नदीचा प्रवाह बदलून लगतच्या शेतीचे भविष्यात पुर पाण्याने नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.सुरु असलेला अवैध वाळू उपस्याबद्दल महसूल व पोलीस खात्यास संपूर्ण माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची नागरिकांत चर्चा असून याविरोधात कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.मुळात येथील सजेत तलाठी पद कायम उपेक्षति राहिले आहे. आता तर अन्य तलाठ्याकडे येथील अतिरिक्त पदभार असल्याने पोलीस व महसूल कर्मचारी यांच्या कृपाआशिर्वादाने अवैध वाळू उपसा सतत अधिक प्रमाणात सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.
देशमाने गोई नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 5:35 PM
देशमाने : गावालगत वाहणाऱ्या गोई नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा राजरोस सुरु असून महसूल व पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ठळक मुद्दे आश्चर्य : अधिकारी, पोलिस यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष