देशमाने : सण, उस्तवानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रथा बघावयास मिळतात, परंतु देशमाने येथील लग्नाअगोदर दंडवत काढण्याची प्रथा जरा वेगळी आणि आश्चर्यकारक अशीच आहे. ही प्रथा केवळ देशमाने येथषच बघायला मिळाली असल्याने, ही न्यारी प्रथा चर्चेचा विषय ठरली आहे.लग्न म्हटले अनेक सोपस्कार वधू-वराकडील मंडळीला करावी लागतात. परंतु देशमाने गावात अन्य लग्नविधी बरोबर दंडवत घालायची पूर्वपार चालत आलेली प्रथा आजही कायम आहे. त्याशिवाय लग्नसोहळा पार पडत नाही. अशी श्रद्धा असल्याने कुठल्याही जाती-धर्माचा वधू-वर यांच्याकडे दंडवताचा विधी लग्नाअगोदर घातलाच जातो.दंडवत सोहळ्यात वधू-वर यांची सवाद्य मिरवणूकीस यांच्या घरापासून प्रारंभ होतो. लग्न घरातील व भाऊबंदकीतील स्त्रिया लग्न घरापासून ते लक्ष्मीआई मंदिरापर्यंत दंडवत घालतात. यावेळी पुरु ष मंडळी काठीने जमिनीवर रेषा ओढतो, यारेषेवर स्त्रिया दंडवत घालतात. यादरम्यान निघालेल्या मिरवणुकीत वाद्यावर सहभागी पुरु ष-महिला नृत्य देखील करतात. गावातील प्रत्येक मंदिरात वधू-वर दर्शन घेतात. त्यानंतर मंदिरात फोडलेला नारळ न वाटता एकत्रीत केला जातो. मिरवणुकीचा शेवट लक्ष्मीआई मंदिरात होतो. मंदिरामध्ये फोडलेल्या नारळातील खोबरे व त्यामध्ये गुळ एकत्र करून तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटला जातो. यानंतर वराची रवानगी थेट लग्नघरी होते. त्यामुळे आज ही अनेक जण लग्नासाठी नव्हे तर दंडवत सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहतात.
देशमानेत न्यारी प्रथा ; लग्नाअगोदर दंडवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 6:00 PM
देशमाने : सण, उस्तवानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रथा बघावयास मिळतात, परंतु देशमाने येथील लग्नाअगोदर दंडवत काढण्याची प्रथा जरा वेगळी आणि आश्चर्यकारक अशीच आहे. ही प्रथा केवळ देशमाने येथषच बघायला मिळाली असल्याने, ही न्यारी प्रथा चर्चेचा विषय ठरली आहे.
ठळक मुद्देआज ही अनेक जण लग्नासाठी नव्हे तर दंडवत सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहतात.