सायकल चळवळ रुजविणारे शहर, म्हणून नाशिकची नवी ओळख बनत आहे. शहरातील विविध सायकलपटूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंडा फडकविला आहे. सायकलचा सराव हा रस्त्यांवर केला जाणे अपेक्षित आहे; मात्र काही हौशी मंडळींकडून आपल्या सायकली थेट गंगापूर धरणासारख्या अत्यंत संवेदनशील व प्रतिबंधित क्षेत्राच्या परिसरात धाडल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरातील अशा काही हौशी हुल्लडबाज सायकलपटूंना रविवारी जलसंपदा विभागाच्या प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने चांगलाच दणका दिला. त्यांच्या ताब्यातील महागड्या सायकली जप्तीची मोहीम राबविली. दिवसभरात तब्बल ३५ सायकली जप्त करण्यास प्रशासनाला यश आले.
--इन्फो--
गेल्या वर्षाची पुनरावृत्ती
लांबलचक डांबरी रस्ते, घाटमार्ग सोडून थेट वीकेंडला गंगापूर धरणाच्या संरक्षक भिंतींवर सायकलिंग करण्याचा प्रताप मागील वर्षीसुध्दा ऑक्टोबर महिन्यात काही हौशी सायकलपटूंनी केला होता. यावर्षी पुन्हा गंगापूर धरणाच्या परिसरात घुसखोरी करत सायकलिंग केले जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली. या तक्रारींची दखल घेत गंगापूर धरणाचे शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी सायकल जप्तीची मोहीम राबविली. शनिवारी दहा आणि रविवारी २५ अशा एकूण ३५ सायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
----इन्फो---
सोशल मीडियावर चमकोगिरीसाठी सायकलिंग!
स्वतःची अन् गंगापूर धरणासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाची सुरक्षितता धोक्यात आणून हे बडे हौशी सायकलपटू केवळ सोशल मीडियावरील चमकोगिरीची हौस भागविण्यासाठी थेट धरणाच्या भिंतीवर सायकलिंगचा प्रताप करताना आढळून आले. सायकलिंग करताना व्हिडिओ, फोटो शूट करणे आणि नंतर ती फेसबुक, व्हाॅट्स ॲप, इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यासाठी हा सगळा आटापिटा चालविला जात असल्याचे समोर आले आहे.
---कोट---
गंगापूर धरणाच्या भिंतीवर सायकलिंग करणे हा मूर्खपणा आहे आणि तितकेच ते धोकादायकसुध्दा आहे. मागीलवर्षापासून हा प्रकार वाढीस लागत असून नाशिक सायकलिस्ट फाैंडेशन या गैरकृत्याचे कधीही समर्थन करणार नाही. प्रशासनाने अशा हौशी वात्रट सायकलपटूंवर कठोर कारवाई करावी. सायकलपटूंनी गंगापूर धरणाची आणि स्वत:ची सुरक्षितता धोक्यात आणू नये.
- राजेंद्र वानखेडे, अध्यक्ष, नाशिक सायकलिस्ट फाैंडेशन
---
फोटो आर वर१४गंगापुर नावाने सेव्ह.
===Photopath===
140621\14nsk_13_14062021_13.jpg
===Caption===
जप्त केलेल्या सायकली.